Dell नं केली कमाल! बजेटमध्ये सादर केला भन्नाट गेमिंग लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 05:21 PM2022-06-21T17:21:00+5:302022-06-21T17:21:13+5:30
Dell G15 लॅपटॉप 5 नव्या व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. बजेटमध्ये युजर्सना गेमिंग लॅपटॉप मिळेल.
Dell नं बजेट गेमिंग लॅपटॉप भारतात सादर केला आहे. AMD Ryzen 6000 H Series प्रोसेसरसह नवीन G15 लॅपटॉप दशेत आला आहे. हा गेमिंग लॅपटॉप असल्यामुळे गेमिंगसाठी आवश्यक असलेली पावर देण्यात आली आहे. तसेच Dolby Audio आणि Game Shift टेक्नॉलॉजी देखील मिळते. तुम्ही जर एखादा दमदार परफॉर्मन्स देणारा लॅपटॉप शोधत असाल तर या लॅपटॉपचा विचार करू शकता.
Dell G15 Gaming Laptop चे स्पेसिफिकेशन्स
Dell G15 लॅपटॉपमध्ये 6800H R7 पर्यंतच्या नेक्स्ट जेनरेशन AMD Ryzen प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपयामध्ये NVIDIA GeForce RTX 3060 पर्यंतचे ग्राफिक्स देण्यात आला आहे. युजर्सना यात 6GB GDDR6 पर्यंत रॅम ऑप्शन मिळत आहे. लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राईटनेस 250 nits पर्यंत आहे.
गेम शिफ्ट फंक्शन FN + गेम शिफ्ट (F9) दाबून अॅक्टिव्ह करता येतं. गेमिंगसाठी आवश्यक अशी सेटिंग ऑप्टिमाइज करण्यात आली आहे. यात एलियनवेयर सारखी थर्मल डिजाइन देण्यात आली आहे. यात ऑप्टिमल थर्मल कूलिंग, ड्युअलिंच एयर इनटेक, अल्ट्रा-थिन फॅन ब्लेड, कॉपर पाइप आणि चार वेंट देण्यात आले आहेत. हा डार्क शॅडो ग्रे आणि फँटम ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल.
किंमत
नव्या Dell G15 लॅपटॉपची किंमत 83,990 रुपयांपासून सुरु होते. टॉप व्हेरिएंटची किंमत 1,27,990 रुपये आहे. हे लॅपटॉप्स Dell.com सह Dell एक्सक्लूसिव स्टोरवरून विकत घेता येतील.