Jio Phone मध्ये नवीन फीचर; आता तुम्ही शेअर करु शकाल इंटरनेट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:55 PM2019-01-08T14:55:25+5:302019-01-08T14:56:39+5:30
रिलायन्स जिओने आपल्या JioPhone मध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत.
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या JioPhone मध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने एक नवी अपडेट जारी केले आहे. याद्वारे JioPhone मध्ये सुद्धा hotspot फीचर जोडले जाईल आणि इंटरनेट दुसऱ्या युजर्संना वापरता येईल शकेल.
नवीन अपडेट फीचर JioPhone च्या सर्व युजर्संना पाठविले जाणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व युजर्सपर्यंत हे फीचर पोहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीकडून आधीच सांगण्यात आले होते की, जिओफोनमध्ये लवकरच हॉटस्पॉट फीचर दिले जाईल.
दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने धुमाकूळ घातल्यानंतर आता नवीन फीचरच्या माध्यमातून मार्केटमध्ये आपले स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिओने 2017 मध्ये JioPhone असा फीचर फोन लाँच केला होता.
JioPhone मध्ये असे घ्या नवीन फीचर
तुम्हाला अद्याप जिओफोनचे हे नवीन फीचर भेटले नसेल तर Settings मध्ये जाऊन Internet Sharing टॅबमध्ये hotspot फीचर चेक करा. जर, फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचा ऑप्शन दिसला नाही तर अद्याप तुमचा फोन अपडेट झाला नाही आहे. फोन अपडेट केल्यानंतर हे नवीन फीचर तुम्हाला दिसेल.
असा करा hotspot चा वापर
- फोनच्या Settings मध्ये गेल्यानंतर Internet and Sharing ऑप्शनमध्ये जा.
- Internet and Sharing ऑप्शनमध्ये Wi-Fi hotspot मिळेल.
- Wi-Fi hotspot ऑप्शन ऑन करा.
- त्यानंतर हॉटस्पॉट नेटवर्कला नाव आणि पासवर्ड सेट करु शकता.