एसरचा प्रिडेटर मालिकेत नवीन गेमींग लॅपटॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 01:45 PM2018-07-25T13:45:58+5:302018-07-25T13:46:48+5:30

एसरने आपल्या प्रिडेटर या मालिकेत हेलिऑस ५०० हा गेमींग लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

New Gaming Laptop in Acer's Predator Series | एसरचा प्रिडेटर मालिकेत नवीन गेमींग लॅपटॉप

एसरचा प्रिडेटर मालिकेत नवीन गेमींग लॅपटॉप

googlenewsNext

एसरने आपल्या प्रिडेटर या मालिकेत हेलिऑस ५०० हा गेमींग लॅपटॉप भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे.

एसरने अलीकडेच निट्रो ५ हा गेमींग लॅपटॉप लाँच केला आहे. यानंतर या कंपनीने पुन्हा एकदा खास गेमर्ससाठी विकसित केलेल्या मॉडेलला भारतीय ग्राहकांसाठी हेलिऑस ५०० च्या माध्यमातून सादर केले आहे. भिन्न प्रोसेसरनुसार याला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. यातील एका व्हेरियंटमध्ये इंटेलचा कोअर आय९+ आणि कोअर आय ७ या दोन्ही प्रोसेसरचा पर्याय देण्यात आलेला आहे. याला एनव्हिडीयाच्या जीटीएक्स १०७० या ग्राफीक्स प्रोसेसरची जोड देण्यात आलेली आहे. तर याला एएमडी रायझेन ७ या प्रोसेसरसोबतही सादर करण्यात आलेले आहे. यात एएमडी ५६ हा ग्राफीक प्रोसेसर असणार आहे. यांच्या मदतीने गेमरला अतिशय उच्च दर्जाच्या ग्राफीक्सने युक्त असणार्‍या गेम्सचा आनंद घेता येणार आहे.

गेमींगमध्ये लॅपटॉप हा खूप लवकर गरम होत असतो. नेमकी ही बाब लक्षात घेत एसरने आपल्या या मॉडेलमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कुलींग सिस्टीम (शीतकरण प्रणाली) देण्यात आली आहे. यात एअरो-ब्लेड थ्री-डी मेटल फॅन्स आणि पाच हिट पाईप्सचा समावेश आहे. यामुळे यात सातत्याने खेळती हवा राहणार आहे. अर्थात, याचा दीर्घ वेळेपर्यंत वापर केला तरी हा लॅपटॉप तापणार नाही. या लॅपटॉपमध्ये १७.३ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याला फुल एचडी आणि फोर-के या दोन्ही क्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. युजर त्याच्या गरजेनुसार याला विविध व्हेरियंटच्या स्वरूपात खरेदी करू शकतो. याला एचडीएमआय आणि थंडरबोल्टची कनेक्टीव्हिटी देण्यात आलेली आहे. याच्या माध्यमातून हा लॅपटॉप तीन अन्य डिस्प्लेंना कनेक्ट करता येणार आहे.  कोणत्याही गेमींग लॅपटॉपमध्ये दर्जेदार ध्वनी प्रणाली आवश्यक असते. या अनुषंगाने यामध्ये दोन स्पीकर आणि एक सब-वुफरसह एसर ट्रु-हार्मनी आणि वेव्हेज मॅक्स ऑडिओ सिस्टीम देण्यात आली आहे. यामुळे यात अगदी जीवंत वाटणार्‍या थ्री-डी सराऊंड साऊंडची अनुभूती घेता येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

हेलिऑस ५०० या गेमींग लॅपटॉपच्या कोअर आय-७ प्रोसेसरवर चालणार्‍या लॅपटॉपची रेंज १,९९,९९० तर कोअर आय-९ वर चालणार्‍या मॉडेल्सची रेंज २,४९,९९० रूपयांपासून सुरू होणारी आहे. तर एएमडी या प्रोसेसरवर आधारित व्हेरियंटचे मूल्य अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

Web Title: New Gaming Laptop in Acer's Predator Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.