iPhone SE: कोट्यवधी अँड्रॉइड युजर्स वळू शकतात iPhone कडे; कमी किंमत, 5G सपोर्टसह येणारा iPhone SE ठरणार गेम चेंजर 

By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 12:43 PM2022-01-10T12:43:23+5:302022-01-10T12:44:36+5:30

iPhone SE: iPhone SE मध्ये 5G सपोर्ट मिळू शकतो, कारण यात Apple A15 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हा फोन लवकरच बाजारात येणार आहे.  

New iphone se to come with 5g support apple a15 processor expected launch in apple event   | iPhone SE: कोट्यवधी अँड्रॉइड युजर्स वळू शकतात iPhone कडे; कमी किंमत, 5G सपोर्टसह येणारा iPhone SE ठरणार गेम चेंजर 

iPhone SE: कोट्यवधी अँड्रॉइड युजर्स वळू शकतात iPhone कडे; कमी किंमत, 5G सपोर्टसह येणारा iPhone SE ठरणार गेम चेंजर 

Next

iPhone SE या Apple च्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनच्या थर्ड जेनरेशन मॉडेलची तयारी सुरु झाली आहे. याआधी आलेल्या लिक्समधून हा फोन 5G सपोर्टसह बाजारात येणार असल्याचं समजलं आहे. आता कंपनी नवीन iPhone SE 5G कनेक्टिविटीसह मार्च किंवा एप्रिलमध्ये Apple Event मध्ये लाँच करू शकते, अशी माहिती मिळाली आहे.  

मार्क गुरमनच्या रिपोर्टनुसार, यावर्षीचा पहिला मोठा इव्हेंट Apple मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित करू शकते. या ऑनलाईन इव्हेंटमधून कंपनी iPhone SE लाँच करू शकते. मार्च किंवा एप्रिलमध्ये होणाऱ्या इव्हेंटमधून बाजारात येणारा हा एकमेव प्रोडक्ट नसेल.  

iPhone SE  

आगामी iPhone SE ची डिजाईन मोठ्याप्रमाणावर जुन्या iPhone 8 सारखी दिसत आहे. यात 4.7 इंचाचा Retina HD LCD डिस्प्ले मिळेल. डिवाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असलेला होम बटन असेल. या फोनला Apple Bionic A15 ची प्रोसेसिंग पॉवर मिळेल. तसेच यात 3GB आणि 4GB RAM चे दोन व्हेरिएंट मिळू शकतात. 5G सपोर्टसह येणारा हा आयफोन डिवाइसमध्ये 12MP चा सिंगल रियर कॅमेरा मिळू शकतो.  

हा आयफोन गेम चेंजर ठरेल, असा दावा J.P. Morgan नं केला आहे. आगामी iPhone SE स्मार्टफोन लो आणि मिड रेंज अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्स तसेच जुने आयफोन युजर्स या परवडणाऱ्या आयफोनकडे वळू शकतात. ज्यात 1.4 बिलियन (जवळपास 140 करोड) अँड्रॉइड युजर्स आणि जवळपास 300 मिलियन (जवळपास 30 करोड) जुन्या आयफोन युजर्सचा समावेश आहे.  

हे देखील वाचा:

संधी सोडू नका! Apple iPhone चे तीन मॉडेल मिळतायत डिस्काउंटवर; अशा आहेत Flipkart, Amazon च्या ऑफर्स

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

Web Title: New iphone se to come with 5g support apple a15 processor expected launch in apple event  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.