महिलांसारखंच स्तनपानाद्वारे बाळाला दूध पाजू शकणार पुरुष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 16:08 IST2019-03-23T16:06:26+5:302019-03-23T16:08:35+5:30
नवजात बाळांचं पालन-पोषण हे एक फार मोठं जबाबदारीचं काम असतं. ही जबाबदारी आई पेक्षा चांगली कुणी निभावू शकत नाही.

महिलांसारखंच स्तनपानाद्वारे बाळाला दूध पाजू शकणार पुरुष
नवजात बाळांचं पालन-पोषण हे एक फार मोठं जबाबदारीचं काम असतं. ही जबाबदारी आई पेक्षा चांगली कुणी निभावू शकत नाही. कारण आईसारखी सहनशीलता आणि त्यागाची भावना वडिलांमध्ये असणं थोडं कठीणच असतं. आई सोबत असेल तर बाळाला सांभाळणे सोपं होतं. पण काही कारणामुळे आईला बाहेर जावं लागलं आणि आपल्या नवजात बाळाचा सांभाळ वडिलांना करावा लागला तर त्यांची काय स्थिती होते हे अनेकांना माहीत असेलच. खासकरून तेव्हा जेव्हा बाळाला आई घरी नसताना अचानक भूक लागते. या समस्येला दूर करण्यासाठी जपानच्या एका कंपनीने एक उपाय शोधून काढला आहे.
जपानची कंपनी डेंटसुने एक डिव्हाइस डिझाइन केलं आहे. या डिव्हाइसच्या मदतीने आता पुरूषही बाळांना 'स्तनपान' करवू शकतील. कंपनीचे म्हणणं आहे की, त्यांनी हे प्रॉडक्ट एक डोळ्यासमोर ठेवून तयार केलं आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पती-पत्नींमध्ये तणावाचं एक मोठं कारण बाळांना फीडिंग म्हणजेच स्तनपान आहे. हे एक असं काम आहे जे पूर्णपणे आईच्या वाट्याला येतं. पण आता हे असं राहणार नाही.
डेंटसु कंपनीने जे डिव्हाइस तयार केलं आहे ते एक फॉर्मूला मिल्क टॅंक आहे. जे शरीरावर लावता येतं. ही टॅंक समोरच्या बाजूने महिलांच्या स्तनांसारखी डिझाइन केली आहे. हे शरीरावर लावून पुरूष आरामात बाळाला जवळ घेऊन दूध देऊ शकतात. कंपनीने सांगितले की, 'आम्ही हे डिव्हाइस तयार केलं कारण ब्रेस्टफीडिंगमुळे कपल्सना होणारा स्ट्रेस कमी व्हावा आणि हे केवळ महिलांचं काम राहू नये'.
या ब्रेस्टफीडिंग मिल्क टॅंकमध्ये समोरच्या बाजूला मिल्क बॉटलसारखी सिलिकनचं निप्पल लावलेलं आहे. तसेच या टॅंकमध्ये दूध गरम करण्याची आणि गरम ठेवण्याची व्यवस्था आहे. हे डिव्हाइस शरीराच्या तापमानानुसार गरम राहतं. म्हणजे बाळाला दूध पिताना आईसोबत असण्याची जाणीव होईल.
कंपनीने याला 'फादर्स नर्सींग असिस्टेंट' असं नाव दिलं आहे. या टॅंकमध्ये सेन्सरही लावले असून हे बाळाला भूक लागण्याची वेळ आणि त्यांच्या झोपण्याची सवय मॉनिटर करतात. या टॅंकची फीचर्स स्मार्टफोन अॅपच्या माध्यमातूनही ऑपरेट करता येऊ शकतात. सध्या हे डिझाइन कॉन्सेप्ट स्टेजवर आहे. पण कंपनी लवकरच हे बाजारात लॉन्च करण्याची तयारी करत आहे.