काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन  

By सिद्धेश जाधव | Published: July 3, 2021 03:32 PM2021-07-03T15:32:20+5:302021-07-03T15:33:55+5:30

Battleground Mobile India Launch: अधिकृतपणे भारतातील अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाल्यावर काही तासांतच 1 कोटी लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे.  

New milestone for battleground mobile india it crossed 10 million downloads in just a few hours  | काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन  

काही तासांत 1 कोटी डाउनलोडस; Battleground Mobile India चे धमाकेदार आगमन  

Next

काल म्हणजे 2 जुलै रोजी PUBG मोबाईलचा भारतीय अवतार अर्थात Battleground Mobile India भारतात लाँच करण्यात आला आहे. 18 जुलै रोजी या गेमचा बीटा व्हर्जन उपलब्ध झाला होता. गेल्यावर्षी हा गेम बॅन झाल्यापासून अनेक PUBG प्रेमी या गेमची आतुरतेने वाट बघत होते. याचा प्रत्यय काही तासांतच समोर आला कारण अधिकृत व्हर्जन उपलब्ध होताच काही तासात 1 कोटी लोकांनी हा गेम आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड केला आहे.  

Battlegrounds Mobile India हा काल भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. या गेमचे 1 कोटी युजर्स पूर्ण झाल्यामुळे गेममध्ये गेमर्सना काही रिवॉर्ड्स देखील मिळणार आहेत. सध्यातरी या गेम फक्त अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी उपलब्ध झाला आहे. या गेमचे आयओएस व्हर्जन कधी उपलब्ध होईल याची कोणतीही माहिती डेव्हलपर क्राफ्टनने दिलेली नाही.  

Battlegrounds Mobile India (BGMI) प्ले स्टोरवरून अशाप्रकारे करा डाउनलोड  

Battlegrounds Mobile India चा अधिकृत व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Play Store वर जावे लागेल. प्ले स्टोरमध्ये ‘Battlegrounds Mobile India’ असा सर्च करा. त्यानंतर हा गेम तुमच्या फोनमध्ये इंस्टाल करा. जर तुमच्या फोनमध्ये गेमचा अर्ली अ‍ॅक्सेस व्हर्जन असेल तर हा गेम अपडेट करण्याचा पर्याय देण्यात येईल. गेम अपडेट केल्यावर तुमचा गेम बीटा व्हर्जनवरून अधिकृत व्हर्जनवर अपडेट होईल.   

हा गेम स्मार्टफोन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Android 5.1.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. तसेच फोनमध्ये कमीत कमी 2GB रॅम असावा, असे डेव्हलपर कंपनी क्रॉफ्टनने सांगितले आहे. BGMI च्या अधिकृत गेम फाईलची साईज 721MB आहे. हा गेम 18 जून रोजी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध झाला होता, बीजीएमआयच्या अर्ली अ‍ॅक्सेस वर्जनचे 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले होते.    

Web Title: New milestone for battleground mobile india it crossed 10 million downloads in just a few hours 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.