8630mAh बॅटरी आणि 10.95 इंचाचा डिस्प्ले; टॅबलेट सेगमेंटमध्ये Oppo Pad घालणार धुमाकूळ
By सिद्धेश जाधव | Published: February 21, 2022 01:00 PM2022-02-21T13:00:03+5:302022-02-21T13:00:35+5:30
Oppo Pad: Oppo Pad 10 इंचाचा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.
Oppo आता टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. कंपनीचा टॅबलेट बाजारात Oppo Pad नावानं पदार्पण करेल. हा टॅब आगामी Oppo Find X5 स्मार्टफोन्ससोबत कंपनी बाजारात उतरवू शकते. हा डिवाइस अनेक सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून टॅबमधील 10 इंचाचा डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा सेटअपची माहिती मिळाली आहे.
Oppo Pad चे लीक स्पेक्स
टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार, ओप्पोच्या आगामी टॅबलेटमध्ये 10.95 इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 2560x1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. डिवाइसमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात येईल. ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू दिला जाऊ शकतो. सोबत 8 जीबी पर्यंतचे रॅम ऑप्शन्स मिळतील. तर 256 जीबीची इंटरनल स्टोरेज असू शकते.
हा डिवाइस अँड्रॉइड 11 ओएससह बाजारात येईल. ओप्पोच्या आगामी टॅबलेटचा कॅमेरा पाहता, बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर मिळेल. रिपोर्टमधून Oppo Pad मधील 8630mAh च्या मोठ्या बॅटरीची माहिती मिळाली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
हे देखील वाचा:
- Smart TV: अर्धी झाली 65 इंचाच्या Smart TV ची किंमत; शानदार 4K डिस्प्लेसह मिळणार 30W चा दमदार साऊंड
- गेल्या आठवड्यात आलेल्या दमदार 5G Smartphone वर 3 हजारांची सूट; फोनमध्ये 50MP कॅमेरा आणि 60W फास्ट चार्जिंग