अशीच भाववाढ झाली तर 5 लाखात iPhone आणि OnePlus साठी द्यावे लागतील 2 लाख : रिपोर्ट
By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2022 03:53 PM2022-06-15T15:53:45+5:302022-06-15T15:53:53+5:30
येत्या दहा वर्षांमध्ये स्मार्टफोनच्या किंमती कशा बदलतील, यावर एक रिपोर्ट समोर आला आहे.
जेव्हा आयफोनच्या किंमतीनं एक लाखांचा टप्पा गाठला तेव्हा सर्वांनीच अॅप्पलविषयी राग व्यक्त केला होता. परंतु लवकरच लोकप्रिय अँड्रॉइड स्मार्टफोन देखील लाखाच्या घरात जाऊ शकतात. एका रिपोर्टनुसार, साल 2032 पर्यंत iPhone च्या टॉप मॉडेलची किंमत 5 लाख रुपयांवर जाऊ शकते. तर OnePlus के फ्लॅगशिप फोनसाठी युजर्सना 2 लाख रुपये खर्च करावे लागतील. हा बदल वाढत्या महागाईमुळे होणार असल्यामुळे Samsung, Motorola, Nokia चे फोन देखील स्वस्त राहणार नाहीत.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता वाढली आहे. रोजच्या आयुष्यातील स्मार्टफोनची उपयुक्तता आणि वापर वाढल्यामुळे एकेकाळी लग्जरी असलेला फोन आता प्रत्येकाच्या हातात दिसतो. यावर ग्राहक पैसे देखील खर्च करू लागले आहेत त्यामुळे स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या महागडे फोन बनवण्यासाठी प्रोत्साहित झाल्या आहेत. 5 वर्षांपूर्वी कोणीही एका सामान्य फ्लॅगशिप फोनची किंमत 1 लाखांवर जाईल, असा विचार केला नसेल. आता तर Samsung देखील आपले फोल्डेबल फोन लाख रुपयांच्या प्राईस टॅगसह सादर करत आहे.
Mozillion च्या रिपोर्टमध्ये पुढील 10 वर्षानंतरची स्मार्टफोन बाजारातील स्थिती काय असेल याचा अंदाज बांधण्यात आला आहे. यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये झालेल्या भाववाढीचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार, 2032 पर्यंत स्मार्टफोन बाजारात अनेक बदल होतील. iPhone च्या फ्लॅगशिप मॉडेलसाठी युजर्सना सुमारे 4.7 लाख रुपये खर्च करावे लागतील. कारण गेल्या 10 वर्षांत कंपनीनं 452 टक्क्यांनी आपल्या फोन्सची किंमत वाढवली आहे.
2012 मध्ये आलेल्या iPhone 5 ची किंमत 199 डॉलर्स (जवळपास 45,000 रुपये) होती. 2021 मध्ये आलेला iPhone 13 Pro Max ची किंमत 1,099 डॉलर्स (जवळपास 1,29,900 रुपये) आहे. असंच सुरु राहिल्यास 10 वर्षांनंतर म्हणजे 2032 मध्ये iPhone च्या फ्लॅगशिप मॉडेलची किंमत सुमारे 6,069 डॉलर्स (जवळपास 4.7 लाख रुपये असेल.
Apple नंतर Motorola, Huawei आणि Samsung या लिस्टमध्ये आहेत, ज्यांनी गेल्या 10 वर्षात सर्वाधिक भाववाढ केली आहे. Huawei च्या फ्लॅगशिप फोनची किंमत 2032 मध्ये 3,300 डॉलर्स (जवळपास 2.57 लाख रुपये) असेल. Motorola च्या फ्लॅगशिपची किंमत 2022 मधील 999.99 डॉलर्स (जवळपास 78,000 रुपये) वरून 233 टक्के वृद्धी होऊन 2032 मध्ये 3,333 डॉलर्स (जवळपास 2.8 लाख रुपये) वर पोहोचेल.
गेल्या दहा वर्षात दक्षिण कोरियन कंपनी Samsung नं 184 टक्क्यांची भाववाढ केली आहे. तर OnePlus नं 2014 पासून आतापर्यंत 142 टक्क्यांनी भाव वाढवले आहेत. त्यामुळे 2032 मध्ये लाँच होणाऱ्या फ्लॅगशिप वनप्लससाठी 2,342 डॉलर्स (जवळपास 1.8 लाख रुपये) मोजावे लागतील.