Jio, Airtel, Vi युझर्ससाठी नवा नियम, आता २४ तास बंद राहणार SIM कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:48 PM2022-11-30T21:48:14+5:302022-11-30T21:49:00+5:30
Sim Card New Rule : सरकारनं सिमकार्ड संबंधी नवा नियम आणला असून यामुळे बँकिंग फ्रॉड सारख्या घटना थांबवण्यास मदत मिळणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
मोबाईल सेवांचा वापर करणाऱ्यांसाठी दूरसंचार विभागाने एक नवीन नियम जारी केला आहे. जर तुम्ही Jio, Airtel, Vodafone-Idea आणि BSNL-MTNL वापरकर्ते असाल तर तुम्हाला नवीन नियम माहित असणे आवश्यक आहे. वास्तविक, दूरसंचार विभागाने (DoT) एक नवीन नियम लागू केला आहे. अशातच नवीन सिम कार्ड सक्रिय झाल्यानंतर ते 24 तासांसाठी बंद राहील. म्हणजेच सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांसाठी इनकमिंग, आउटगोइंग आणि एसएमएसची सुविधा बंद राहणार आहे. सिमकार्ड फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता असे पाऊल उचलण्यात आले आहे. दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे.
नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही याची सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत DoT ग्राहकाची पडताळणी करेल. ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास, नवीन सिम सक्रिय केले जाणार नाही.
फसवणूक थांबवण्यास मदत
सध्या ग्राहकाची वैयक्तिक माहिती चोरणे खूप सोपे झाले आहे. याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. त्याच नवीन सिममधून ओटीटी मिळवून बँकिंग फसवणुकीच्या घटना घडतात.
देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ नोंदवली जात आहे. यासोबतच डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याचे अनेक प्रसंगी दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी 24 तासांचा नवीन लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.