डेलच्या लॅपटॉपची नवीन श्रुंखला
By शेखर पाटील | Published: January 3, 2018 03:46 PM2018-01-03T15:46:32+5:302018-01-03T15:46:56+5:30
डेल कंपनीने आपल्या इन्स्पिरॉन या मालिकेत लॅपटॉपची नवीन श्रुंखला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
डेल कंपनीने आपल्या इन्स्पिरॉन या मालिकेत लॅपटॉपची नवीन श्रुंखला भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
डेल कंपनीने इन्स्पिरॉन १३ ७,००० (७३७३); इन्स्पिरॉन १५ ७,००० (७५७०) आणि इन्स्पिरॉन १३ ५,००० (५३७०) हे तीन लॅपटॉप भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. इंटेलच्या कोअर आय-५ आणि आय-७ या प्रोसेसर्सने युक्त असणारे या तिन्ही मॉडेल्सचे स्वतंत्र व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत.
इन्स्पिरॉन १३ ७,००० (७३७३) हे लॅपटॉप या श्रेणीतील उच्च क्षमतेचे आहे. या मॉडेलमध्ये १३.३ इंच आकारमानाचा आणि फुल हाय डेफिनेशन म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबत ब्लॅकलीट या प्रकारातील कि-बोर्ड दिलेला असेल. यात क्विक चार्ज तंत्रज्ञानाने युक्त असणारी बॅटरी देण्यात आली असून ती अवघ्या १५ मिनिटांमध्ये चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. यात युएसबी टाईप-सी स्ट्रीमिंगसाठी स्मार्टबाईट सुविधा देण्यात आल्या आहेत. विंडोज हॅलो आणि इन्फ्रारेड कॅमेर्याच्या मदतीने यात फेसियल रेकग्नीशन प्रणाली दिलेली आहे. यात ८ व १६ जीबी रॅमसह ५१२ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजचे पर्याय देण्यात आले आहेत.
इन्स्पिरॉन १५ ७,००० (७५७०) या मॉडेलमध्ये १५.६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात ३२ जीबीपर्यंत रॅमचे तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी एचडीडी व १ टेराबाईटपर्यंत हार्ड डिस्क ड्राईव्ह या प्रकारातील स्टोअरेजचे पर्याय असतील. यातील बॅटरी ९ तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर इन्स्पिरॉन १३ ५,००० (५३७०) या मॉडेलमध्ये १३ इंच आकारमानाचा फुल एचडी डिस्प्ले असेल. यातील रॅम ३२ जीबीपर्यंत तर स्टोअरेजसाठी १ टिबीपर्यंतचे पर्याय असतील. या दोन्ही लॅपटॉपमध्ये ग्राफीक कार्डही देण्यात आले असून त्याच्या मदतीने गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. या सर्व मॉडेलच्या विविध व्हेरियंटचे मूल्य ६० हजारांपासून सुरू होणार आहे. हे सर्व लॅपटॉप देशभरातील शॉपीजमधून ग्राहकाना खरेदी करता येतील.