10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 12:33 PM2023-09-04T12:33:31+5:302023-09-04T12:34:05+5:30
जर कोणी ३० सप्टेंबरनंतर विना रजिस्ट्रेशन सिम कार्ड विकले तर १० लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे.
बोगस सिमकार्ड वाढल्याने फ्रॉडही वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ट्रायने सिम कार्ड नियमांमध्ये बदल केले आहेत. हे बदल १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. विक्री होत असलेल्या सिम कार्ड पॉईंटवरून अशी सिम चालू केली जात होती. यामुळे या विक्रेत्यांवरच जरब बसवण्यात येत आहे.
जर कोणी ३० सप्टेंबरनंतर विना रजिस्ट्रेशन सिम कार्ड विकले तर १० लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे. आता गल्लो गल्ली कोणीही सिमकार्ड विकू शकणार नाहीय. आधार आणि पासपोर्ट सारखी तपासणी केली जाणार आहे यानंतरच नवे सिम दिले जाणार आहे. पोलिस व्हेरिफिकेशनही केले जाणार आहे.
जर तुमच्या नावावर कोणता फौजदारी गुन्हा नोंद असेल तर फसवणुकीच्या गुन्ह्यात असाल तर तुम्हाला सिमकार्ड विकण्याचे लायसन दिले जाणार नाही. सिम कार्ड विकण्यासाठी लायसन लागणार आहे. तुम्ही कोणाला लायसन वापरण्यासाठी देत असाल तर तुमचा एजंट आणि वितरक यांचीही पोलिस पडताळणी होईल.
सिम विक्रेत्याला आधार आणि पासपोर्ट तपशीलांसह कॉर्पोरेट ओळख क्रमांक आणि व्यवसाय परवाना यांसारखी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. सिम विक्रेत्याला आधार आधारित ई-केवायसी सारखे बायोमेट्रिक तपशील द्यावे लागणार आहेत. टेलिकॉम ऑपरेटर आणि पीओएस यांच्यामध्ये लेखी करार करावा लागणार आहे. यामध्ये ग्राहक नोंदणी, कामाचे कार्यक्षेत्र आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणती कारवाई होईल याचा उल्लेख असणार आहे. जर कोणतीही चूक केली तर २४ तासांच कायमचे ब्लॉक केले जाणार आहे.