असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मॉडेलची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Published: July 23, 2018 01:09 PM2018-07-23T13:09:46+5:302018-07-23T13:11:05+5:30
असुस कंपनीने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत दिले असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
असुस कंपनीने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत दिले असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. असुसने एप्रिल महिन्याच्या शेवटी झेनफोन मॅक्स प्रो (एम१) हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज या दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे १०,९९९ आणि १२,९९९ रूपये मूल्यात लाँच केले होते. आता या स्मार्टफोनची वाढीव ६ जीबी रॅम असणारी आवृत्ती लाँच करण्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्ये ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील उर्वरित फिचर्स हे मूळ आवृत्तीनुसारच असणार आहेत.
झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. अलीकडच्या काळात स्मार्टफोन युजर्स मल्टी-टास्किंगला प्राधान्य देत असतात. या पार्श्वभूमीवर, यातील उत्तम बॅटरी ही सेलींग पॉइंट ठरण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये पॅसीव्ह मॅक्स-बॉक्स अँम्प्लीफायर दिलेले असून यामुळे अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभूती घेता येते. हा स्मार्टफोन ५.९९ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे.
झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याच्या अंतर्गत एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, ५ एलीमेंट लेन्स, ८० अंशातील अँगल व्ह्यू लेन्सने युक्त असणारा १३ मेगापिक्सल्सचा एक कॅमेरा आहे. तर यातील दुसरा कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा आहे. यात बोके इफेक्ट देण्याची सुविधा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी हा स्मार्टफोन एफ/२.० अपार्चर, ८५.५ अंशाचा अँगल व्ह्यू आदींसह ८ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्याने सज्ज आहे. हा स्मार्टफोन २६ जुलैपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.