हुआवे वाय ५ प्राईमची नवीन आवृत्ती
By शेखर पाटील | Published: May 21, 2018 02:58 PM2018-05-21T14:58:37+5:302018-05-21T14:58:37+5:30
हुआवे कंपनीने आपल्या वाय ५ प्राईम या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्याचे संकेत दिले असून याची लिस्टींग करण्यात आली आहे.
हुआवे कंपनीचा हा स्मार्टफान वाय ५ प्राईम (२०१८) या नावाने बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. याचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत माहिती देण्यात आली नसली तरी याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली आहे. यात याच्या सर्व फिचर्सची माहिती देण्यात आली आहे. यात मेटलची युनिबॉडी डिझाईन प्रदान करण्यात आली आहे. तर यात ५.४५ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १४४० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा फुल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फेस अनलॉक हे फिचरदेखील देण्यात आले आहे. तर याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. यामध्ये नेमका कोणता प्रोसेसर असेल याची माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. यामध्ये ३०२० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारे असेल.
हुआवे वाय ५ प्राईम या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.