ओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल

By शेखर पाटील | Published: November 28, 2017 08:57 AM2017-11-28T08:57:36+5:302017-11-28T08:57:52+5:30

ओप्पो कंपनीने आपल्या ओप्पो एफ 5 या स्मार्टफोनची 6 जीबी रॅमयुक्त आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.

new version of Oppo F5 | ओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल

ओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल

Next

काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारपेठेत ओप्पो एफ5 हे मॉडेल 4 जीबी रॅम व 32 जीबी स्टोअरेज तसेच 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आले होते. यातील फक्त 4 जीबी रॅमचे मॉडेल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले होते. आता याचे दुसरे म्हणजे 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इनबिल्ट स्टोअरेजयुक्त मॉडेल ग्राहकांना 24,990 रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि रेड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये फ्लिपकार्टवरून मिळणार आहे. सोमवारपासून (27 नोव्हेंबर) याची आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांना प्रत्यक्षात हे मॉडेल1  डिसेंबरपासून मिळणार असल्याचे ओप्पो कंपनीने जाहीर केले आहे.

ओप्पो एफ 5 हे मॉडेल सेल्फी स्पेशल या प्रकारातील आहे. या स्मार्टफोनमध्ये एफ/2.0 अपार्चरयुक्त 20 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्सने युक्त असणारे एआय ब्युटी रिकग्नेशन हे फिचर देण्यात आले आहे. याच्या मदतीने हा कॅमेरा सेल्फी घेणार्‍या युजरचे वय, त्वचेचा रंग, लिंग आदी बाबींना ओळखू शकतो. यात ‘फेशियल रिकग्नीशन’ तंत्रज्ञानाने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात सेल्फी प्रतिमांना बोके इफेक्टदेखील देण्याची सुविधा आहे. तर जिओ-टॅगींग, एचडीआर, पॅनोरामा, टच फोकस, फेस डिटेक्शन आदी फिचर्सने सज्ज असणारा यातील मुख्य कॅमेरा हा फेज डिटेक्शन ऑटो-फोकस व एलईडी फ्लॅशसह 16  मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल.  

ओप्पो एफ 5 या स्मार्टफोनमध्ये 6 इंच आकारमानाचा आणि 2160  बाय 1080 पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास 5 चे संरक्षक आवरण असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 660  प्रोसेसर असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर 3.2 हा युजर इंटरफेस असेल. तर यात 4,000 मिलीअँपिअर इतक्या क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

ओप्पो एफ 5 या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्स आदी फिचर्सही असतील.  

Web Title: new version of Oppo F5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.