Bike चालवणाऱ्यांसाठी खूशखबर, रस्त्यावर अपघातातून वाचवणार 'हे' खास डिवाइस, जाणून घ्या किंमत
By अमित इंगोले | Published: October 14, 2020 04:49 PM2020-10-14T16:49:30+5:302020-10-14T17:06:54+5:30
ऑस्ट्रियातील स्टार्टअप कंपनी मोटोबिटने रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी एक खास डिवाईस तयार केलं आहे.
देशभरात दररोज रस्त्यांवर होणाऱ्या शेकडो अपघातांमध्ये हजारो लोकांचा जीव जातो. लोकांना गाड्या हळू चालवा, नियमाने चालवा असं सगळं सांगितलं जातं. पण अनेकदा सगळे नियम पाळूनही काहीतरी असं घडतं की, अपघात होतोच. पण आता हेच अपघातात जाणारे जीव वाचवण्यासाठी एक खास डिवाइस उपयोगात येणार आहे. ऑस्ट्रियातील स्टार्टअप कंपनी मोटोबिटने रस्त्यांवरील अपघात टाळण्यासाठी दुचाकीस्वारांसाठी एक खास डिवाइस तयार केलं आहे. हे डिवाइस वाहन चालणाऱ्यासोबत कम्युनिकेट करेल. याला 'सेंटिनेल' असं नाव देण्यात आललं आहे.
news18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, अपघात टाळणारं हे खासप्रकारचं डिवाइस क्राऊडफंडींग वेबसाइटवर १२८ डॉलर म्हणजेच भारतीय करन्सीनुार ९ हजार ५०० रूपयांना बुक केलं जाऊ शकतं. या डिवाइसच्या मदतीने वाहन चालकाचं लक्ष रस्त्यावर आणि वेगावर असेल.
स्मार्टफोनशी करा कनेक्ट
या डिवाइसची खासियत म्हणजे हे डिवाइस ब्लूटूथ द्वारे तुमच्या स्मार्टफोनशी कनेक्ट केलं जाऊ शकतं. रस्त्यावर वाहन चालवताना हे डिवाईस चालकाला सतर्क राहण्यास मदत करतं. इतकेच नाही तर सेंटिनेल डिवाइस चालकाच्या वागणुकीचं विश्लेषण देखील करतं. डिवाइस वाहनाचा वेग जास्त झाला तर कमी करण्याचा संकेतही देतं.
आणखी एक खासियत
हे डिवाइस तयार करणाऱ्या कंपनीने दावा केला की, हे डिवाइस हातावर घातल्याने रस्त्याने वाहन चालवताना अपघात टाळता येऊ शकतो. या डिवाइसचं वेगळेपण म्हणजे चालकाला ऑडिओ किंवा व्हिज्युअल सूचना देण्याऐवजी थेट चालकाशी संवाद साधण्याचा यात पर्याय आहे. तसेच अपघात झाल्यास वेळीच या डिवाइसच्या माध्यमातून इमरजन्सी संदेशही पाठवला जाऊ शकतो.
ग्रुप रायडिंग मोड
सेंटिनेल डिवाइसमध्ये सेंटिनेल रायडिंग मोडही देण्यात आला आहे. म्हणजे तुम्ही मित्रांसोबत बाईकने कुठे फिरायला जात असाल तर या डिवाइसच्या माध्यमातून तुम्ही एक सुरक्षित अंतर ठेवूनही वाहन चालवू शकता. कंपनीला हे डिवाइस तयार करण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागला. हे डिवाइस २०२२ मध्ये भारतात उपलब्ध होईल अशी अपेक्षा केली जात आहे.