पुढचे 48 तास जगभरात Internet Shutdown; हे आहे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 01:11 PM2018-10-12T13:11:37+5:302018-10-12T13:13:35+5:30

जगभरातील इंटरनेट युजर्संसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील 48 तास नेटीझन्सना इंटरनेट मिळणार नाही. इंटरनेटचा प्रमुख डोमेन सर्वर पुढील काही

Next 48 hours worldwide Shutdown Internet; because... | पुढचे 48 तास जगभरात Internet Shutdown; हे आहे कारण!

पुढचे 48 तास जगभरात Internet Shutdown; हे आहे कारण!

googlenewsNext

नवी दिल्ली - जगभरातील इंटरनेट युजर्संसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढील 48 तास नेटीझन्सना इंटरनेट मिळणार नाही. इंटरनेटचा प्रमुख डोमेन सर्वर पुढील काही तासांसाठी रुटीन मेंटनन्स मोडवर असणार आहे. त्यामुळे इंटरनेट बंद राहणार असल्याचे सांगण्यात येते. या इंटरनेट बंदचा फटका जगभरातील अब्जावधी नेटीझन्सना बसणार आहे.

रशिया टुडे या वृत्त संस्थेनुसार, पुढील काही तास जगभरातील इंटरनेट सेवा खंडीत होणार आहे. इंटरनेट युजर्संच्या नेटवर्क आणि इंटरनेट सर्व्हीस प्रोवायडरच्या क्षमतेनुसार या इंटरनेट बंदचा फटका युजर्संना बसणार आहे. कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स या कालावधीत क्रिप्टोग्राफिकमध्ये बदल करुन मेंटनेंसचे काम करणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा अड्रेस बुक या डोमेन नेम सिस्टम (DNS) ला प्रोटेक्ट करण्यासाठी मदत करणार आहे. ICANN ने म्हटले की, सायबर अटॅकच्या वाढत्या घटनांपासून बचाव करण्यासाठी मेंटनेंसचे हे काम करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

Web Title: Next 48 hours worldwide Shutdown Internet; because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.