एनएफसी: स्मार्टफोन नव्हे डिजिटल वॉलेट

By अनिल भापकर | Published: January 1, 2018 10:46 PM2018-01-01T22:46:14+5:302018-01-01T22:49:35+5:30

तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स्मार्टफोन फक्त शिल्लक असतो. बरं स्मार्टफोन विकुन कितीसे पैसे मिळतील आणि तुमचा जुना स्मार्टफोन कोण विकत घेईल ? म्हणजेच तुमच्या टूरची वाट लागलीच म्हणून समजा .पण जर तुमचा स्मार्टफोनच तुमच्या क्रेडिट /डेबिट कार्ड प्रमाणे काम करू लागला तर ?

NFC: Not just a Smartphone, Digital Wallet | एनएफसी: स्मार्टफोन नव्हे डिजिटल वॉलेट

एनएफसी: स्मार्टफोन नव्हे डिजिटल वॉलेट

googlenewsNext
ठळक मुद्देहोय ! आता नवीन एनएफसी तंत्रज्ञानाने हे शक्य आहे. आपला मोबाइलच डिजिटल वॉलेट म्हणून काम करू शकेल असे दिवस येऊ घातलेत ! स्मार्टफोनमध्ये एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे तंत्रज्ञान आलं आहे. त्याच्या मदतीनं स्मार्टफोनचं रूपांतरच वॉलेटमधे होऊ शकतं!एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट मशीनवरून तुमचा एनएफसी फीचर असलेला मोबाइल फिरवला की क्रेडिट/डेबिट कार्डप्रमाणो पेमेंट करता येऊ शकतं.

तुम्ही सहकुटुंब एखाद्या प्रवासाला गेला आहात, मस्त एन्जॉय करता आहात, फिरणं-हॉटेलिंग आदि अगदी व्यवस्थित चालू असतं आणि अचानक तुमच्या खिशातील पाकीट चोरीला जातं. तुमचे पैसे, तिकीट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असं सारं चोरील  गेलेलं असतं. तुमच्याकडे तुमचा स्मार्टफोन फक्त शिल्लक असतो. बरं स्मार्टफोन विकुन कितीसे पैसे मिळतील आणि तुमचा जुना स्मार्टफोन कोण विकत घेईल ? म्हणजेच तुमच्या टूरची वाट लागलीच म्हणून समजा . असे एक ना अनेक विचार मनात येतात . पण जर तुमचा स्मार्टफोन न विकता त्यातून पैसे बाहेर आले तर ?  म्हणजेच तुमचा स्मार्टफोन तुमच्या क्रेडिट /डेबिट कार्ड प्रमाणे काम करू लागला तर ?

होय ! आता नवीन एनएफसी तंत्रज्ञानाने हे शक्य आहे. आपला मोबाइलच डिजिटल वॉलेट म्हणून काम करू शकेल असे  दिवस येऊ घातलेत ! स्मार्टफोनमध्ये एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे तंत्रज्ञान आलं आहे. त्याच्या मदतीनं स्मार्टफोनचं रूपांतरच वॉलेटमधे होऊ शकतं!

एनएफसी हे तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय आहे?

बँकिंग क्षेत्रात सर्वप्रथम पैशाने व्यवहार सुरू झाला. त्यानंतर मात्र चेक , डीडी, मनी ऑर्डर असे अनेक प्रकार मनीट्रान्सफरसाठी बॅँकांनी सुरू केले. त्यानंतर काळाप्रमाणो मनीट्रान्सफर किंवा बॅँकिंगची व्यवहार करण्याची पद्धत बदलत गेली. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इलेक्ट्रॉनिक मनीट्रान्सफर असे अनेक आधुनिक प्रकार  बॅँकिंग क्षेत्रात दाखल झाले. आता मात्र ई-कॉमर्स आणि बॅँकिंग मध्ये  ज्यांचा उल्लेख बॅँकिंगचे भविष्य म्हणून केला जातो आहे त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट. यासाठी तुमच्या स्मार्टफोन मध्ये एनएफसी हे फीचर असणं मात्र जरूरी आहे. आजघडीला जवळपास अनेक आघाडीच्या स्मार्टफोनमध्ये एनएफसी हे फीचर उपलब्ध आहे.

एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे असं तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट मशीनवरून तुमचा एनएफसी फीचर असलेला मोबाइल फिरवला की क्रेडिट/डेबिट कार्डप्रमाणो पेमेंट करता येऊ शकतं. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानात काही खरेदी करता किंवा एखाद्या हॉटेलमध्ये बिल पेड करता त्यावेळी तुमचं क्रेडिट/डेबिट कार्ड त्या मशीनमध्ये स्वॅप  करता आणि नंतर पिन टाकून पेमेंट करता. अगदी तसंच काहीसं मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट या तंत्रज्ञानात एनएफसीचा वापर करून केलं जातं. यामध्ये मोबाइल स्वॅप करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं मशीन वापरलं जातं. ज्यामध्ये एनएफसी अर्थात निअर फिल्ड कम्युनिकेशन हे तंत्रज्ञान असलेला मोबाइल रीड होतो. मोबाईल या मशीनवरून एका विशिष्ट अंतरावरून फक्त फिरवला आणि तुमचा सिक्युरिटी पासवर्ड टाकला की हे मशीन तुमच्या मोबाइलमधील क्रेडिट/डेबिट कार्ड वाचून त्यातून पैसे कापून व्यवहार पूर्ण करेल. म्हणजे तुमचा मोबाइल यापुढे एक क्रेडिट/डेबिट कार्ड म्हणून काम करेल. एका मोबाइलमध्ये अनेक कंपन्यांचे क्रेडिट/डेबिट कार्ड वापरता येतं. सध्या काही बॅँकांनी एनएफसीचा वापर करून मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेटची सुविधा सुरू केली आहे.

एनएफसी तंत्रज्ञानाचे फायदे कुठले?

१. एनएफसीचा वापर मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट म्हणून करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सिक्युरिटी. कारण आपण अनेक वेळा वाचतो की,अमुक एका क्रेडिट/डेबिट कार्डधारकाचे क्रेडिट/डेबिट कार्ड हॅक करून रक्कम परस्पर पळवली.  मात्र सिक्युरिटीच्या बाबतीत मोबाइल वॉलेट किंवा डिजिटल वॉलेट अधिक सिक्युअर असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

२. एनएफसी तंत्रज्ञानाचा दुसरा फायदा म्हणजे तुमचा मोबाइल जेवढा तुम्ही सांभाळून ठेवता तेवढे तुमचे खिशातील वॉलेट ठेवत नाही.

३. मोबाइल चोरीला जाण्याचे प्रमाण कमी आहे. कारण मोबाइल शक्यतो तुम्ही हातातच ठेवता. शिवाय वॉलेट चोरीला गेल्यामुळे त्यातील क्रेडिट/डेबिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. जर एनएफसीचा मोबाइल चोरीला गेला तरी अधिक कडक सिक्युरिटी फीचर्समुळे त्यातील क्रेडिट/डेबिट कार्डचा गैरवापर होण्याची शक्यता नसते.

Web Title: NFC: Not just a Smartphone, Digital Wallet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.