तुमच्या मेसेजेसवर मर्यादा, मध्यरात्रीपासून व्हॉट्सअॅपचे 'हे' नवे फिचर लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 07:55 PM2018-07-30T19:55:50+5:302018-07-30T19:56:31+5:30
केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तात्काळ फेक न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे सूचवले होते. तर,
नवी दिल्ली - देशात व्हॉट्सअॅपद्वारे खोटा प्रचार होत असून फेक न्यूज मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येत आहेत. तर खोटे मेसेजेस, व्हिडिओ आणि फोटोंच्या प्रसारातून हिंसा आणि मारहाणीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या इशाऱ्यानंतर व्हॉट्सअॅपने नवी फिचर सुरु करण्याचे सांगितले होते. त्यानुसार रविवारी रात्री 12 पासून हे नवीन फिचर सुरु केले आहे. त्यामुळे यापुढे 5 पेक्षा जास्त लोकांना मेसेज पाठवता येणार नाही.
व्हॉट्सअॅपने सध्या डेस्कटॉप आणि टॅबलेटवरुन व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या युजर्संसाठी हे फिचर लागू केले आहे. त्यामुळे डेस्कटॉपवरुन किंवा टॅबलेटवरुन 5 पेक्षा अधिक मेसेज फॉरवर्ड करता येणार नाहीत. तर लवकरच हे फिचर मोबाईल युजर्संसाठीही लागू करण्यात येणार असल्याचे समजते. केंद्र सरकारच्या आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला नोटीस पाठवली होती. त्यामध्ये, तात्काळ फेक न्यूजला आळा घालण्यासाठी उपाय करण्याचे सूचवले होते. तर, तसे न झाल्यास व्हॉट्सअॅपवर कारवाई करण्याचा इशाराही भारत सरकारने दिला होता. त्यानंतर व्हॉट्सअॅपने मेसेजेस फॉरवर्डींगवर नियंत्रणासाठी पाऊले उचलली. त्यानुसार कुणाकडूनही आलेला फॉरवर्डेड मेसेज हा मेसेज मिळणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर फॉरवर्डेड अशा स्वरुपात येण्यास सुरुवात झाली आहे. तसेच व्हॉट्सअॅपकडून एक प्रसिद्धी पत्रक तयार करुन 10 नियमांचे पालन करण्यास युजर्संना सांगण्यात आले होते. तर ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीला मेसेज फॉरवर्ड करता येणार, हे ठरविण्याचा अधिकार ग्रुप अॅडमिनला देण्यात आला होता. व्हॉट्अॅपकडून केवळ भारतीय युजर्संसाठी हे बदल लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, या नवीन फिचरला लवकरच मोबाईल युजर्संसाठी लागू केले जाऊ शकते.