ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली; नितीन गडकरींनी दिली खास माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 10:42 AM2024-03-28T10:42:59+5:302024-03-28T10:43:36+5:30

टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल.

No Toll Plaza, no Fastag, now a new system is coming Nitin Gadkari told the whole plan | ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली; नितीन गडकरींनी दिली खास माहिती!

ना Toll प्लाझा, ना Fastag, आता येतेय नवी प्रणाली; नितीन गडकरींनी दिली खास माहिती!

भाजप नेते तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी टोलसंदर्भात एक मोठी माहिती शेअर केली आहे. सरकार लवकरच टोल यंत्रणा रद्द करण्याचा विचार करत आहे. त्या जागी आता नवीन प्रणाली येणार आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे. त्यांनी X प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात माहिती दिली आहे.

टोल वसुलीची ही नवीन प्रणाली अथवा यंत्रणा उपग्रह आधारित असणार आहे. ही यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारची डेडलाइन समोर आलेली नाही. या यत्रणेंतर्गत, युजर्स महामार्गावर जेवढे किलोमिटर अंतर पार करतील, त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून आपोआप पैसे कापले जातील. यामुळे युजर्सना सेव्हिंगचीही संधी मिळेल.

मार्च 2024 पर्यंत लागू होणार होती योजना -
मार्च 2024 पर्यंत नवी प्रणाली लागू करण्यचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उद्दीष्ट होते. याच्या सहाय्याने टोल प्लाझावर लागणारा वेळ कमी होईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते.
 

Web Title: No Toll Plaza, no Fastag, now a new system is coming Nitin Gadkari told the whole plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.