WhatsAppवर व्हायरल होतेय 'The Kashmir Files' चित्रपटाची बनावट लिंक; पोलिसांनी जारी केला अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 03:48 PM2022-03-17T15:48:34+5:302022-03-17T15:49:21+5:30

'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

Noida police alert whatsapp users over fraud Kashmir Files movie download links | WhatsAppवर व्हायरल होतेय 'The Kashmir Files' चित्रपटाची बनावट लिंक; पोलिसांनी जारी केला अलर्ट

WhatsAppवर व्हायरल होतेय 'The Kashmir Files' चित्रपटाची बनावट लिंक; पोलिसांनी जारी केला अलर्ट

googlenewsNext

'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यासोबतच सायबर गुन्हेगारही याचा फायदा घेत आहेत. सध्या व्हॉट्सअॅपवर काश्मीर फाइल्सची डाउनलोड लिंक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे वापरकर्त्यांना चित्रपट विनामूल्य डाउनलोड करण्यास प्रवृत्त करत आहे. नोएडा पोलिसांचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी व्हॉट्सअॅपवर या फसवणुकीबाबत मोबाईल वापरकर्त्यांना अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द काश्मीर फाइल्स चित्रपट डाउनलोड करण्यासाठी बनावट लिंक्स व्हायरल करुन त्यातून फसवणुकीचा डाव सायबर गुन्हेगार रचत आहेत. 

सोशल मीडिया आणि द काश्मीर फाइल्सवर 'फ्री अॅक्सेस' देणार्‍या व्हॉट्सअॅप लिंकवर क्लिक करण्यापासून पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅपवर मालवेअरवर लिंकवर क्लिक केल्याने फोन हॅक होऊ शकतात आणि नंबरशी लिंक असलेली बँक खाती रिकामी होऊ शकतात. पोलिसांनी फसवणुकीशी संबंधित काही तक्रारी नोंदवल्या आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांनी चित्रपटाच्या काही डाउनलोड लिंकवर क्लिक केले, परंतु त्यांनी या लिंक्स उघडताच, हॅकर्सना उघडपणे वापरकर्त्यांच्या फोन तपशीलांचा अॅक्सेस मिळाला आणि बँक खाते क्रमांकांसारखे खाजगी तपशील चोरण्यात त्यांना यश आलं. 

काश्मीर फाइल्सवरून व्हॉट्सअॅपवर फसवणूक
“हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअॅपवर चित्रपट मोफत डाउनलोड करण्यासाठी लिंक पाठवण्यास सुरुवात केली आहे. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केल्यानंतर, ते हॅकर्सना वापरकर्त्यांच्या फोनवरील माहितीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देतात आणि बँक खात्याच्या माहितीसह खाजगी तपशील सहजपणे चोरतात", असं सिंग यांनी म्हटलं आहे.

हॅकर्सच्या अनेक बनावट लिंक्स तयार झाल्या आहेत ज्या आता व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. लिंकमध्ये, काश्मीर फाइल्स चित्रपट हाय क्वालिटी आणि विनामूल्य डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनच्या ब्राउझरची लिंक उघडताच हॅकर्स फोनमधील मालवेअर सक्रिय करतात. मिळालेल्या माहितीनुसार, २४ तासांच्या आत किमान तीन युजर्सनी केवळ एका पोलिस ठाण्यात सायबर फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. यामध्ये त्यांचे एकूण 30 लाखांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Noida police alert whatsapp users over fraud Kashmir Files movie download links

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.