TWS Earbuds: दमदार बॅटरी लाईफ! फक्त 1,500 रुपयांच्या आत Noise चे Earbuds लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 03:36 PM2021-12-18T15:36:41+5:302021-12-18T15:36:49+5:30
TWS Earbuds: Noise Beads Earbuds मध्ये ब्लूटूथ 5.1, 18 तासांची बॅटरी लाईफ, टाईप-सी पोर्ट आणि IPX5 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स मिळतात.
TWS Earbuds: Noise नं भारतात नवीन बजेट ट्रू वायरलेस (TWS) इयरबड्स सादर केले आहेत. Noise Beads Earbuds मध्ये ब्लूटूथ 5.1, 18 तासांची बॅटरी लाईफ, टाईप-सी पोर्ट आणि IPX5 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स मिळतात. यात गुगल आणि सीरी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो. चला जाणून घेऊया या इयरबड्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.
Noise Beads Earbuds चे स्पेसिफिकेशन्स
नॉइज बीड्स TWS इयरबड्स इन-ईयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.1 आणि हायपरसिंक टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे. त्यामुळे हे बड्स केस ऑन केल्यावर लगेचच डिवाइसशी कनेक्ट होतात आणि कनेक्टड राहतात.
नॉइज बीड्स ट्रू वायरलेस इयरबड्स सिंगल चार्जवर 7 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. सोबत चार्जिंग केस असल्यास युजर्स अजून 11 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवू शकतात. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. यातील टच कंट्रोलच्या मदतीनं म्युजिक कंट्रोल करता येतो. हे बड्स IPX5 रेटेड आहेत, म्हणजे हे पाण्यापासून सुरक्षित राहतात.
Noise Beads Earbuds ची किंमत
नॉइज बीड्स ट्रू वायरलेस इयरबड्सची किंमत 3,499 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे बड्स अॅमेझॉनवरून 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 24 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून यांची विक्री अॅमेझॉनवर सुरु होईल.