फक्त 1,499 रुपयांमध्ये लाँच झाले Noise Buds VS201; जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
By सिद्धेश जाधव | Published: June 23, 2021 06:52 PM2021-06-23T18:52:02+5:302021-06-23T18:52:51+5:30
Noise Buds VS201 launch: Noise Buds VS201 मध्ये 14 तासांचा प्लेबॅक टाइम मिळू शकतो.
Noise कंपनीने भारतात Noise Buds VS201 ट्रू वायरलेस स्टिरिओ (TWS) इयरबड्स भारतात लाँच केले आहेत. यात ड्युअल इक्वालायजर हे अनोखे फिचर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. IPX5 वॉटर रेसिस्टंससह येणारे हे बड्स 14 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात.
Noise Buds VS201 चे फीचर्स
हे इयरबड्स वापरताना आरामदायी वाटावे म्हणून त्यांचे वजन (50g) कमी ठेवण्यात आले आहे. या बड्समध्ये संपूर्ण टच कंट्रोल देण्यात आले आहेत. ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटीसह येणारे हे बड्स अँड्रॉइड आणि आयओएस अश्या दोन्ही स्मार्टफोन सोबत वापरता येतात. IPX5 स्वेट रेसिस्टंसमुळे तुम्ही हे बड्स व्यायाम करताना देखील वापरू शकता. Noise Buds VS201 मध्ये व्हॉइस असिस्टंट कंट्रोल्स देण्यात आले आहेत जे गुगल असिस्टंट आणि सिरीला सपोर्ट करतात.
या इयरबड्स सोबत टाईप सी कनेक्टर असलेली चार्जिंग केस मिळते. हे बड्स सिंगल चार्जमध्ये 4.5 तास वापरता येतात. चार्जिंग केसची जोड मिळाल्यावर हा प्लेबॅक टाइम 14 तासांवर जातो.
Noise Buds VS201 ची किंमत
Noise Buds VS201 ची किंमत 1,499 रुपये ठेवण्यात आली आहे. परंतु या इयरबड्सची इंट्रोडक्टरी प्राईस 1,299 रुपये आहे. ही इंट्रोडक्टरी किंमत किती काळ उपल्बध असेल याची माहिती मात्र कंपनीने दिली नाही. एक वर्षाच्या वॉरंटीसह येणारे हे इयरबड्स अमेझॉनवरून विकत घेता येतील.