Smartwatch: तुम्हाला किती गाढ झोप लागते हे सांगणार Smartwatch; झोपेची गुणवत्ता एका क्लीकमध्ये समजणार
By सिद्धेश जाधव | Updated: February 14, 2022 13:19 IST2022-02-14T13:19:26+5:302022-02-14T13:19:47+5:30
Budget Smartwatch: Noise ColorFit Pulse Grand स्मार्टवॉच SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरसह सादर करण्यात आला आहे.

Smartwatch: तुम्हाला किती गाढ झोप लागते हे सांगणार Smartwatch; झोपेची गुणवत्ता एका क्लीकमध्ये समजणार
Noise ColorFit Pulse Grand नावाचा नवीन स्मार्टवॉच भारतात सादर झालं आहे. यात 60 फिटनेस मोड आणि हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटरिंग, मेनूस्ट्रल सायकल आणि स्लिप ट्रॅकिंग सारखे हेल्थ फिचर मिळतात. Amazon वर याची किंमत 3,999 रुपये दाखवण्यात आली आहे. तसेच या स्मार्टवॉचचे शॅम्पेन ग्रे, इलेक्ट्रिक ब्लू, जेट ब्लॅक आणि ऑलिव कलर ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. लाँच ऑफर अंतर्गत 18 फेब्रुवारी दुपारी 12 वाजल्यापासून हे स्मार्टवॉच फक्त 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Noise ColorFit Pulse Grand चे स्पेसिफिकेशन्स
नॉइज कलरफिट प्लस ग्रेंडमध्ये 1.69-इंचाचा एलसीडी LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक मोठा डिस्प्ले असलेला फिटनेस ट्रॅकर्स आहे. नॉइज कलरफिट प्लस ग्रेंडमध्ये 150 क्लाउड-बेस्ड वॉच फेस मिळतात, जे तुम्हाला कस्टमायजेशनमध्ये मदत करतात. तसेच या फिटनेस ट्रॅकर सोबत IP68 रेटिंग मिळते, ज्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो.
नॉइज कलरफिट प्लस ग्रेंड स्मार्टवॉच 60 पेक्षा जास्त फिटनेस मोडला सपोर्ट करतो. यातील स्लिप मॉनिटरिंग फिचर एका क्लीकमध्ये तुमच्या झोपेची गुणवत्ता सांगू शकतं. तसेच यात मेनूस्ट्रल सायकल, ब्लड ऑक्सिजन लेव्हल (SpO2) आणि 24x7 हार्ट रेट मॉनिटरिंग देखील होते. वॉचमधील बॅटरी बॅकअपची माहिती मात्र समजली नाही. परंतु 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 25 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो, असं समोर आलं आहे.
हे देखील वाचा:
- Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो
- जुन्या नोटा आणि नाणी करू शकतात तुम्हाला मालामाल; ‘या’ 5 वेबसाईट करतील मदत