हार्ट रेट आणि SpO2 सेन्सर Noise ColorFit Ultra स्मार्टवॉच लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 16, 2021 02:46 PM2021-07-16T14:46:54+5:302021-07-16T14:48:17+5:30
Noise ColorFit Ultra price: Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
ऑडिओ आणि वियरेबल प्रॉडक्ट्स सादर करणारा ब्रँड म्हणून Noise ची ओळख आहे. आज कंपनीने भारतात आपल्या स्मार्टवॉच लाईनअपमध्ये ColorFit Ultra नावाचा अजून स्मार्टवॉच जोडला आहे. या स्मार्टवॉचमध्ये 9 दिवसांचा बॅटरी लाईफ देणारी 300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Noise ColorFit Ultra ची किंमत
Noise ColorFit Ultra ची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच अॅल्यूमिनियम अलॉय बॉडीसह स्पेस ब्लु, क्लाउड ग्रे आणि गनमेटल ग्रे रंगात 16 जुलैपासून अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Noise ColorFit Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Noise ColorFit Ultra मध्ये 1.75-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 320 x 385 पिक्सल आहे. या वॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस मिळतात. हा स्मार्टवॉच कॉल व एसएमएस नोटिफिकेशन्सन, कॉल रिसीव्ह/रिजेक्ट, स्टॉप वॉच आणि इतर अनेक फीचर्सना सपोर्ट करतो.
हा डिवाइस IP68 वॉटर रेजिस्टंट आहे. यार हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेन्सर देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचच्या मदतीने हार्टरेट, कॅलरीज आणि झोपेची नोंद ठेवता येईल. Noise ColorFit Ultra एकदा फुल चार्ज केल्यास 9 दिवस वापरता येईल. तसेच यात 30 दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम मिळेल. या स्मार्टवॉचमध्ये देण्यात आलेली 300mAh ची बॅटरी 2 तासांत फुल चार्ज होते.