8 मिनिटांच्या चार्जिंगवर 8 तास चालणारे Bluetooth Neckband लाँच; किंमत 1800 रुपयांपेक्षाही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 07:43 PM2022-01-19T19:43:08+5:302022-01-19T19:43:15+5:30
Noise Combat मध्ये ड्युअल-माइक सिस्टम मिळते. जिचा वापर Environmental Voice Cancellation साठी केला जातो.
Noise Combat ब्लूटूथ नेकबँड भारतात लाँच झाले आहेत. कंपनीनं हे इयरफोन्स गेमिंग इयरफोन्स म्हणून मार्केट करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार यात फास्ट चार्जिंग आणि अल्ट्रा-लो लेटन्सी असे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यांची किंमत देखील खूप कमी ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Noise Combat चे फीचर्स आणि किंमत.
Noise Combat चे स्पेसिफिकेशन
Noise Combat मध्ये ड्युअल-माइक सिस्टम मिळते. जिचा वापर Environmental Voice Cancellation साठी केला जातो. कंपनीनं यात क्रिस्टल क्लियर साउंड आणि कॉल क्वालिटीसाठी 10mm ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. सिंगल चार्जवर हे नेकबँड 25 तास वापरता येतात. तर इन्स्टाचार्जमुळे फक्त 8 मिनिटांच्या चार्जवर 8 तासांचा प्ले बॅक टाइम मिळतो. यासाठी टाइप-सी चार्जिंग केबल मिळते. यातील IPX5 रेटिंग पाण्यापासून संरक्षण देते. नेकबँड ब्लूटूथ v5.0 सह सादर करण्यात आले आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे यात खास गेमिंग मोड देण्यात आला आहे. जो 45 मिलीसेकंड पर्यंतची अल्ट्रा-लो लेटन्सी देतो. त्यामुळे गेममधून कानांपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो. यासाठी खास इमर्सिव आणि ओम्नी डायरेक्शनल साउंड क्वॉलिटी देण्यात आली आहे. गेमिंगसाठी खास मोड असला तर म्युजिक, व्हिडीओज आणि कॉलवर देखील हे इयरफोन्स चांगली काम करतात.
Noise Combat ची किंमत
Noise Combat ची किंमत 1799 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरफोन्स फक्त थंडर ब्लॅक या एकमेव रंगात विकत घेता येतील.