कॉल उचलण्यासाठी फोनला हात लावण्याची गरज नाही; म्युझिक आणि कॉलिंगसह ‘स्मार्ट चष्म्या’ची एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: June 22, 2022 04:00 PM2022-06-22T16:00:34+5:302022-06-22T16:00:58+5:30
Noise i1 नावाचा स्मार्ट चष्मा भारतात लाँच करण्यात आला आहे, जो हेडफोन्सचे फिचर देतो.
भारतीय कंपनी Noies आपल्या ऑडिओ प्रोडक्ट्स आणि स्मार्टवॉचेससाठी ओळखली जाते. कंपनीनं आपल्या पोर्टफोलियोमध्ये आता स्मार्ट ग्लासेसचा देखील समावेश केला आहे. या चष्म्याचं नाव Noise Smart EyeWear i1 असं ठेवण्यात आलं आहे. परंतु अन्य स्मार्ट ग्लासेस प्रमाणे यात कॅमेरा, बिल्ट इन डिस्प्ले किंवा अन्य स्मार्ट फीचर्स नाहीत.
Noise Smart EyeWear i1 हा चष्मा नॉइज लॅबमध्ये शानदार ऑडिओ ऑडियो एक्सपीरियंस देण्यासाठी बनवण्यात आला आहे. जो ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोनशी कनेक्ट होतो आणि याचा वापर स्मार्टफोनवरील म्युझिक ऐकण्यासाठी किंवा कॉल्स अटेंड करण्यासाठी केला जाऊ शकतो. या नॉइजच्या नव्या गॅजेटची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्याची विक्री कंपनीच्या वेबसाईटवर सुरु झाली आहे.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या स्मार्ट आयवेयरमधील टच कंट्रोल्सच्या मदतीनं म्यूजिक प्ले आणि पॉज करता येतं. तसेच कॉल रिसिव्ह आणि रिजेक्ट करण्यासाठी देखील टच कंट्रोल देण्यात आले आहेत. एका टचच्या मदतीनं तुम्ही फोनमधील व्हॉईस असिस्टंट देखील अॅक्टिव्हेट करू शकता. हा चष्मा अँड्रॉइडसह आयओएस डिवाइससोबत देखील सहज कनेक्ट होऊ शकतो.
यात पावर असलेले लेन्स टाकून देखील या चष्म्याचा वापर करता येईल. यातील बॅटरी सिंगल चार्जवर 9 तासांचा म्यूजिक स्ट्रीमिंग टाइम देते. 15 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा म्यूजिक टाइम मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.1 देण्यात आलं आहे. यातील लेन्सेस अतिनील किरणांपासून डोळ्याचं संरक्षण करतात. तसेच स्क्रीनमधून येणाऱ्या ब्लू लाईटचा प्रभाव देखील कमी करतात. Noise Smart EyeWear i1 स्मार्ट ग्लासेस IPX4 रेटिंगसह येत असल्यामुळे यांच्यावर पाणी आणि शिंतोड्यांचा प्रभाव पडत नाही.