Budget Smartwatch: परवडणाऱ्या किंमतीती आला Noise X-Fit 1 स्मार्टवॉच; 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह भन्नाट फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: November 22, 2021 03:21 PM2021-11-22T15:21:41+5:302021-11-22T15:21:54+5:30
Budget Smartwatch: Noise X-Fit 1 स्मार्टवॉचची किंमत 3000 रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आला आहे.
Noise या भारतीय ब्रँडने आज आपल्या नव्या Budget Smartwatch ची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने HRX या फॅशन ब्रँडसोबत भागेदारी केली आहे. नव्या स्मार्टवॉचचे नाव Noise X-Fit 1 असे ठेवण्यात आले आहेत. या डिजिटल वॉचमध्ये SpO2 Sensor, IP68 रेटिंग आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. चाल जाणून घेऊया या स्मार्टवॉचची किंमत स्पेक्स आणि फीचर्स.
Noise X-Fit 1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Noise X-Fit 1 मध्ये 1.52-इंचाचा IPS Truview डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉच 100 पेक्षा जास्त क्लाउड-बेस्ड कस्टमाइजेबल वॉच फेसला सपोर्ट करतो. यात 24/7 ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, ब्लड-ऑक्सीजन लेव्हल मोजण्यासाठी SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि स्ट्रेस मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच या वॉचच्या मदतीने 15 स्पोर्ट्स मोड देखील ट्रॅक करता येतात. हा वॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.
अन्य फीचर्स पाहता, या वॉच मधील क्विक-रिप्लायच्या मदतीने आलेल्या स्मार्टफोन असलेल्या मेसेजेसना काही प्री-लोडेड क्विक रिप्लाय देता येतात. Noise X-Fit 1 मध्ये 210mAh ची बॅटरीमिळते. ही बॅटरी फुल चार्ज केल्यास 10 दिवस वापरता येते, असा कंपनीने दावा केला आहे. या वॉचसोबत मॅग्नेटिक केबल देण्यात आली आहे.
Noise X-Fit 1 ची किंमत
Noise X-Fit 1 ची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉच 26 नोव्हेंबरपासून विकत घेता येईल. हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच ब्लॅक आणि व्हाइट ऑप्शनमध्ये अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.