नोकियाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत व फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 09:35 AM2018-03-27T09:35:52+5:302018-03-27T09:35:52+5:30
कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्तातील हॅण्डसेट आहे.
नवी दिल्ली- नोकिया 1 हा स्मार्टफोन अखेरीस भारतात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. अँड्रॉइड 8.1 ओरियो (गो एडिशन) वर चालणारा हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे. नोकियाचं लायसन्स असणाऱ्या एचएमडी ग्लोबलने यावर्षी बार्सिलोनात मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. अँड्रॉइड ओरियोवर चालणाऱ्या काही निवडक मोबाइलपैकी नोकिया 1 हा मोबाइल आहे. ग्राहकांना या स्मार्टफोनचा उत्तर अनुभव मिळेल, असा दावा अँड्रॉइड गो इकोसिस्टम करतं आहे. या फोनमध्ये गुगल अॅप्स आणि सव्हिसेसचे लाइटवेट वर्जन आहेत. नोकिया 1 या फोनबद्दल विशेष गोष्ट म्हणजे हा मोबाइल कंपनीचा आत्तापर्यंतचा सर्वात स्वस्तातील हॅण्डसेट आहे.
नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात 5 हजार 499 रूपयांना मिळेल. देशभरातील प्रत्येक मोबाइलच्या दुकानात ग्राहकांना हा स्मार्टफोन विकत घेता येणार आहे. डार्क ब्लू आणि वॉर्म रेड अशा दोन रंगामध्ये हा फोन मिळतो आहे. याशिवाय टेलिकॉम सर्विस प्रोवायडर रिलायन्स जिओने या फोनवर 2200 रूपयांच्या कॅशबॅकची ऑफर दिली आहे. कॅशबॅकनंतर हा फोन ग्राहकांना 3299 रूपयांना मिळेल. तसंत 4 जी 60 जीबी डेटाही मिळणार आहे.
ड्युअल सिम नोकिया 1मध्ये 4.5 इंच FWVGA (480x854 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये 1.1 गीगाहर्ट्ज क्वाड-कोअर मीडियाटेत एमटी 6737 एम प्रोसेसर आणि 1 जीबी रॅम आहे. फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा असू फिक्स फोकस लेन्स आणि एलईडी फ्लॅश उपलब्ध आहे. तर 2 मेगापिक्सेल फ्रन्ट कॅमेरा आहे.
नोकिया1मध्ये 8 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. तसंच 4 जी वोल्ड, वायफाय, ब्लुटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो युएबी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक असे फिचर्स आहेत. फोनमध्ये 2150 एमएएचची बॅटरी आहे. ही बॅटरी 9 तास टॉक टाइम व 15 तास स्टँडबाय टाइमपर्यंत सुरू राहिल, असा कंपनी दावा करते आहे.