फक्त 2,799 रुपयांमध्ये नोकियाने लाँच केला 4G फोन; जाणून घ्या Nokia 110 4G चे वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: July 23, 2021 05:26 PM2021-07-23T17:26:44+5:302021-07-23T17:29:42+5:30
Nokia 110 4G Launched in India: Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल.
गेल्याच महिन्यात नोकियाने दोन 4G फिचर फोन जागतिक बाजारात लाँच केले होते. हे फोन्स कंपनीने Nokia 110 4G आणि Nokia 105 4G नावाने बाजारात आले होते. आता यातील Nokia 110 4G फोन कंपनीने भारतात लाँच केला आहे, ज्याची किंमत फक्त 2,799 रुपये आहे. (Nokia 110 4G Feature Phone With HD Calling Launched in India)
Nokia 110 4G ची किंमत
Nokia 110 4G भारतात 2,799 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. हा फोन Yellow, Aqua आणि Black रंगात उपलब्ध होईल. नोकिया 110 4जी फोनची विक्री 24 जुलैपासून सुरु होईल आणि हा नोकिया फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.
Nokia 110 4G Phone फीचर्स व स्पेसिफिकेशन्स
नोकिया 110 4जी मध्ये कंपनीने 1.8 इंचाचा QQVGA डिस्प्ले दिला आहे. हा फोन Series 30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो, तसेच यात प्रोसेसिंगसाठी Unisoc T107 चिपसेट देण्यात आला आहे. Nokia 110 4G फोनमध्ये 128एमबी रॅम आणि 48एमबी इंटरनल स्टोरेज मिळते. ही स्टोरेज 32 जीबी पर्यंत माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.
या फिचर फोनमध्ये 0.08MP QVGA रियर कॅमेरा मिळतो. तसेच या फोनमध्ये टॉर्च, एफएम रेडिओ, एमपी3 प्लेयर आणि 3.5mm हेडफोन जॅक असेल फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो VoLTE सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Nokia 110 4G फोनमध्ये 1,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.