Nokia घेऊन येतेय स्वस्त फोल्डेबल फोन; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: December 20, 2021 03:32 PM2021-12-20T15:32:46+5:302021-12-20T15:32:56+5:30

Nokia 2760 Flip 4G: Nokia 2760 Flip 4G स्मार्टफोन KaiOS वर चालेल. तसेच यात 1450mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी सिंगल चार्जवर 6.8 तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि 13.7 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देईल.

Nokia 2760 flip 4g foldable phone specification and image leaked before launch  | Nokia घेऊन येतेय स्वस्त फोल्डेबल फोन; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत 

Nokia घेऊन येतेय स्वस्त फोल्डेबल फोन; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि किंमत 

Next

Nokia फिचर फोन्सच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम करत आहे. याआधी देखील कंपनीनं जुनी डिजाईन आणि नवीन तंत्रज्ञान असलेले फिचर फोन बाजारात उतरवले आहेत. आता असाच एक फोन FCC प्लॅटफॉर्मवर मॉडेल नंबर TA-1398 सह लिस्ट करण्यात आला आहे. हा Nokia N139DL फ्लिप फोन असल्याची माहिती नोकिया पॉवरयुजर वेबसाईटनं दिली आहे. हा डिवाइस बाजारात Nokia 2760 Flip 4G नावानं सादर केला जाईल.  

Nokia 2760 Flip 4G चे स्पेसिफिकेशन्स  

लिस्टिंगनुसार Nokia 2760 Flip 4G स्मार्टफोन KaiOS वर चालेल. तसेच यात 1450mAh ची बॅटरी देण्यात येईल, जी सिंगल चार्जवर 6.8 तासांपर्यंतचा टॉकटाइम आणि 13.7 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देईल. तसेच Nokia 2760 Flip 4G मध्ये 5 मेगापिक्सलचा रियर-फेसिंग कॅमेरा मिळेल. तसेच या आगामी फ्लिप फोनमध्ये 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स मिळतील. त्याचबरोबर मल्टीमीडिया मेसेजिंग, हॅन्ड्सफ्री स्पिकर, कलर डिस्प्ले, एमपी3 प्लेयर आणि टी4/एम4 हियरिंग एड कम्पॅटिबल (एचएसी) रेटिंग असे फिचर मिळतील.  

Nokia 2760 Flip 4G ची किंमत 

रिपोर्ट्सनुसार, Nokia 2760 Flip 4G फिचर फोन खिशाला परवडणारा नसेल. हा फोन जागतिक बाजारात 80 डॉलर्समध्ये सादर केला जाईल. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत जवळपास 6,000 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन कधी लाँच होईल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

Web Title: Nokia 2760 flip 4g foldable phone specification and image leaked before launch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.