नोकिया ३.१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Updated: August 9, 2018 23:42 IST2018-08-09T23:41:29+5:302018-08-09T23:42:57+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ३.१ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी आज सादर करण्याची घोषणा केली आहे.

नोकिया ३.१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती बाजारपेठेत दाखल
एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया ३.१ या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी आज सादर करण्याची घोषणा केली आहे.
नोकिया ब्रँडची मालकी असणार्या एचएमडी ग्लोबल कंपनीने जुलै महिन्यात भारतीय ग्राहकांना नोकिया ३.१ हे मॉडेल सादर केले होते. हा स्मार्टफोन गतवर्षी लाँच केलेल्या नोकिया ३ या स्मार्टफोनची अद्ययावत आवृत्ती असल्याचे कंपनीने लाँचींगच्या वेळी नमूद केले होते. प्रारंभी हे मॉडेल २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या स्वरूपात सादर करण्यात आले होते. आता याला नवीन स्वरूपात बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. या व्हेरियंटची रॅम ३ जीबी असून इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. तर यातील उर्वरित फिचर्स हे आधीच्या मॉडेलनुसारच असतील असे एचएमडी ग्लोबलने जाहीर केले आहे.
नोकिया ३.१ या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि एचडी प्लस क्षमतेचा २.५ डी वक्राकार डिस्प्ले असून यावर कॉनींग गोरीला ग्लास ३चे संरक्षक आवरण असणार आहे. यात मीडीयाटेकचा ऑक्टा-कोअर ६७५० प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा असून यात ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅश असणार आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८४.६ अंशातील व्ह्यू असणारा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ‘अँड्रॉइड वन’ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा आहे. याचे मूल्य ११,९९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल ब्ल्यू/कॉपर, ब्लॅक/क्रोम आणि व्हाईट/आयर्न या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. १२ ऑगस्टपासून हा स्मार्टफोन पेटीएम मॉल, नोकिया ऑनलाईन स्टोअर तसेच देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येणार आहे.