नोकियाचे दोन दमदार स्मार्टफोन्स लाँच; ड्युअल कॅमेरासह पहा काय आहे खास...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 01:48 PM2018-08-21T13:48:25+5:302018-08-21T13:49:18+5:30
दोन्ही फोन nokia.com/phones आणि फ्लिपकार्टवर विक्रीला उपलब्ध होणार आहेत.
नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेसह जगभरात एकेकाळी राज्य केलेल्या नोकिया या ब्रँडने पुन्हा नव्या दमाने बाजारपेठेत शिरकाव केला आहे. एचएमडी ग्लोबलने आज भारतीय बाजारात नोकियाचे 6.1 प्लस आणि 5.1 प्लस हे दोन फोन लाँच केले.
नोकियाने चीनमध्ये एक्स6 हा फोन लाँच केला होता. Nokia 6.1 Plus हे त्याचेच जागतिक व्हर्जन आहे. या दोन्ही फोन्सना आयफोन X सारखा नॉच डिस्प्ले आहे. तसेच कंपनीने दोन्ही फोनमध्ये नॅनो पेंटींग टेक्नॉलॉजी आणरिअर ग्लास फिनिश सारखे नवी वैशिष्टे दिली आहेत.
दोन्ही फोन nokia.com/phones आणि फ्लिपकार्टवर विक्रीला उपलब्ध होणार आहेत. नोकियाच्या 6.1 प्लसची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. याफोनसाठी आगाऊ बुकिंग मंगऴवारपासून आणि पहिला सेल 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तर नोकिया 5.1 प्लसची विक्री सप्टेंबरपासून होणार आहे. या फोनची किंमत अद्याप कंपनीने जाहीर केलेली नाही. मात्र, विक्रीच्या आधी सांगण्यात येणार आहे.
Announcing the newest addition to the Nokia smartphone family… the new #Nokia6Plus. 5.8” display, 19:9 aspect ratio (with notch!). Stand out and tell your story. Find out more information here. https://t.co/nWtHZlzsjq#Nokiamobilepic.twitter.com/jsgPhWjbYD
— Nokia Mobile (@Nokiamobile) August 21, 2018
Nokia 6.1 Plus मध्ये 5.8 फुल एचडीप्लस (1080x2280 पिक्सल) डिस्प्ले आणि 2.5डी गोरिला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. डिस्प्लेवर एक नॉच देण्यात आली असून स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. ऑक्टाकोअर स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. 64 जीबी अंतर्गत मेमरी आणि मेमरीकार्डद्वारे 400 जीबी पर्यंत मेमरी वाढविता येणार आहे.
दमदार कॅमेरा, बॅटरी
अँड्रॉइड 8.1 ओरिओ, ड्युएल सिम आणि 3060 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरीला फास्ट चार्जिंगचा दावा केला आहे. ही बॅटरी 30 मिनिटांतच 50 टक्के चार्ज होते. 16 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल मोनोक्रोम सेंसरसह ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढील बाजुला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
नोकिया 5.1 प्लसमध्ये काय खास
5.8 इंचाची फुल एचडीप्लस (1080x2280 पिक्सल) डिस्प्लेसह 19:9 स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. मीडियाटेक हीलियो पी60 हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 5 मेगापिक्सल सेंकडरी कॅमेरासह ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर पुढे 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.