नोकिया ७ प्लस : जाणून घ्या सर्व फिचर्स
By शेखर पाटील | Published: April 5, 2018 06:45 PM2018-04-05T18:45:00+5:302018-04-05T18:45:00+5:30
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे.
एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोनदेखील भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. नोकिया ६ (२०१८) आणि नोकिया ८ सिरोक्को या मॉडेल्ससोबत नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन आता भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही नोकिया ७ या मॉडेलची नवीन आवृत्ती असणार आहे. यात मूळ मॉडेल्सपेक्षा काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
अतिशय मजबूत अशी मेटलची बॉडी देण्यात आलेली आहे. यामध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा तसेच १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसरने सज्ज असणार्या या मॉडेलची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
नोकिया ७ प्लसच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात झेईस कंपनीचे १२ आणि १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे लेन्स असतील. यातील एक टेलिफोटो लेन्स आहे. यात पोर्ट्रेट मोडची सुविधादेखील देण्यात आलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.० अपार्चरयुक्त १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. या कॅमेर्यांमध्ये नोकियाची खासियत असणारा बोथी मोड देण्यात आला आहे. याच्या मदतीने फ्रंट व बॅक कॅमेर्यांचा एकदचा उपयोग करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात प्रो कॅमेरा हे फिचर दिलेले असून याच्या मदतीने युजरला अॅडव्हान्स सेटिंगवर परिपूर्ण पद्धतीने नियंत्रणाची सुविधा मिळणार आहे.
यासोबत इमेजिंग सूट दिलेला असून याच्या मदतीने प्रतिमांवर अतिशय आकर्षक असे फिल्टर्स लावण्याची सुविधा देण्यात आली आहे. यात ३८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा आहे. नोकिया ७ प्लस हा स्मार्टफोन २५,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला असून अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याची २० एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे. याच दिवसापासून हा स्मार्टफोन देशभरातील नोकियाच्या शॉपीजमधूनही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.