Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 11:47 AM2022-03-29T11:47:13+5:302022-03-29T11:50:22+5:30

Nokia C01 Plus स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेऱ्यासह भारतात आला आहे.

Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399   | Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Nokia चा सर्वात स्वस्त Smartphone लाँच; JioPhone Next ला दाखवणार का बाहेरचा रस्ता? 

Next

Nokia नं भारतात आपला एंट्री लेव्हल स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनची किंमत इतकी कमी आहे की JioPhone Next हा डिवाइस चांगली टक्कर देऊ शकतो. HMD Global नं देशात Nokia C01 Plus लाँच केला आहे. ज्यात 2GB रॅम, 3000mAh ची बॅटरी आणि 5MP चा कॅमेरा, असे एंट्री लेव्हल स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या नोकिया स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Nokia C01 Plus ची किंमत 

Nokia C01 Plus चे दोन व्हेरिएंट्स भारतीयांच्या सेवेत दाखल झाले आहेत. 2 जीबी रॅमसह 16 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 6,299 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेल 6,799 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच Jio Exclusive offer अंतगर्त या स्मार्टफोनवर 600 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे, त्यामुळे दोन्ही व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 5699 रुपये आणि 6199 रुपये होईल. 

Nokia C01 Plus चे स्पेसिफिकेशन्स  

नोकिया सी01 प्लस कंपनीने 18:9 अस्पेक्ट रेशियोसह सादर केला गेला आहे. हा फोन 720 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने Nokia C01 Plus अँड्रॉइड 11 ओएससह लाँच केला आहे, फोनमध्ये Android 11 Go Edition देण्यात आले आहे. 

या फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. नोकियाचा हा स्मार्टफोन 2 जीबी रॅमसह 16 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते. हा ड्युअल सिम फोन बेसिक कनेक्टिविटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे. 

Nokia C01 Plus च्या बॅक पॅनलवर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील 5 मेगापिक्सलचाच फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो. 3.5एमएम जॅक सोबत सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Web Title: Nokia C01 Plus Launched In India With Jio Exclusive Offer At Rs 5399  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.