लो बजेट सेगमेंटमध्ये Nokia ची एंट्री; 7 हजारांपेक्षा कमी किंमतीत आला धमाकेदार फोन
By सिद्धेश जाधव | Published: April 7, 2022 12:07 PM2022-04-07T12:07:25+5:302022-04-07T12:07:34+5:30
नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे.
Nokia दरवर्षी MWC इव्हेंटमध्ये एकाच वेळी अनेक स्मार्टफोन सादर करते आणि नंतर ते स्मार्टफोन एक एक करून ग्राहकांच्या भेटीला येतात. यावर्षी देखील कंपनीनं मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या इव्हेंटमधून Nokia C2 2nd Edition सादर केला होता. परंतु कंपनीनं या फोनच्या किंमत किंवा उपलब्धतेची माहिती दिली नव्हती. आता नोकिया सी2 सेकेंड एडिशनची किंमत समोर आली आहे.
Nokia C2 2nd Edition ची किंमत
Nokia C2 2nd Edition चा एकच व्हेरिएंट कंपनीनं युरोपियन बाजारात सादर केला आहे. ज्याची किंमत 79 यूरो (जवळपास 6,550 रुपये) ठेवण्यात आली आहे. फोन Gray व Blue कलर्समध्ये विकत घेता येईल. सध्या जरी हा फोन युरोपियन बाजारात आला असला तरी लवकरच याचं भारतीय बाजारात पदार्पण होऊ शकतं.
Nokia C2 2nd Edition चे स्पेसिफिकेशन्स
एंट्री लेव्हल स्मार्टफोन Nokia C2 2nd Edition चे स्पेसिफिकेशन्स देखील तसेच आहेत. यात 5.7-इंचाचा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 960 x 480 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालतो. कंपनीनं यात 1.5GHz क्लॉक स्पीड असलेला MediaTek चा क्वॉड कोर प्रोसेसर दिला आहे. सोबत 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळते. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी Nokia C2 2nd Edition मध्ये दोनच कॅमेरे देण्यात आले आहेत. हे दोन्ही कॅमेरे 5 मेगापिक्सलचे आहेत, एक फ्रंटला तर एक मागे LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर या फोनमध्ये मिळतात, परंतु या बजेटमध्ये देखील कंपनीनं फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. पावर बॅकअपसाठी या नोकिया फोनमध्ये 2,400mAh बॅटरी देण्यात आली आहे.