Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ 

By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 01:17 PM2022-02-28T13:17:15+5:302022-02-28T13:21:40+5:30

Nokia Smartphone: Nokia Nokia नं जागतिक बाजारात Nokia C2 2nd Edition, Nokia C21 आणि Nokia C21 Plus असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत.

Nokia c2 2nd edition nokia c21 and nokia c21 plus launched check price  | Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ 

Nokia चा ट्रिपल धमाका! किफायतशीर किंमतीतील 3 स्वस्त स्मार्टफोन; रियलमी-रेडमीच्या अडचणींत वाढ 

googlenewsNext

Nokia Smartphone: Nokia नं जागतिक बाजारात तीन नवीन स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. यात Nokia C2 2nd Edition, Nokia C21 आणि Nokia C21 Plus स्मार्टफोनचा समावेश आहे. या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये एंट्री लेव्हल स्पेक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे यांची किंमत खूप कमी असू शकते, परंतु कंपनीनं मात्र किंमत अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. चला एक नजर टाकूया नवीन नोकिया फोन्सच्या स्पेक्स आणि फीचर्सवर.  

Nokia C2 2nd Edition  

नोकिया सी2 सेकंड एडिशन एक अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणार फोन आहे. यात कंपनीनं 5.7-इंचाचा डिस्प्ले दिला आहे. फोनमधील क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसरसह 2GB पर्यंत RAM आणि 32GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. या फोनमध्ये 2400mAh ची रिमूव्हेबल बॅटरी देण्यात आली आहे. 

Nokia C21  

Nokia C21 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर Unisoc SC9863A चिपसेट देण्यात आला आहे. 3GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह येणारा हा फोन अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालतो. फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो. फ्रंटला देखील एलईडी फ्लॅश मिळतो सोबत 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि बॅटरी बॅकअपसाठी 3000mAh ची बॅटरी मिळते.  

Nokia C21 Plus  

Nokia C21 Plus मध्ये ऑक्टाकोर Unisoc SC9863A प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळते. अँड्रॉइड 11 (गो एडिशन) वर चालणारा हा फोन 6.5 इंचाच्या HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनमध्ये मागे एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात कंपनीनं 4000mAh ची बॅटरी दिली आहे. 

हे देखील वाचा:

Web Title: Nokia c2 2nd edition nokia c21 and nokia c21 plus launched check price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.