चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे कमी किंमत असलेला Nokia C20 Plus; 11 जूनला होईल लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: June 3, 2021 01:02 PM2021-06-03T13:02:53+5:302021-06-03T13:04:39+5:30

Nokia C20 Plus Launch: Nokia C20 Plus 11 जूनला लाँच होईल, यात ड्युअल कॅमेरा आणि 3GB रॅम असेल. 

Nokia c20 plus to launch on 11 june in china  | चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येत आहे कमी किंमत असलेला Nokia C20 Plus; 11 जूनला होईल लाँच  

Nokia C20 Plus 11 जूनला लाँच होईल.

googlenewsNext

Nokia आपले नवीन स्मार्टफोन लाँच करणार अशी माहिती गेले कित्येक दिवस समोर येत आहे. आता अशी बातमी आली आहे कि नोकिया C-सीरीजमध्ये Nokia C20 Plus नावाचा एक नवीन फोन लाँच करणार आहे. कंपनीने देखील अधिकृतपणे या डिवाइसची लाँच डेट सांगितली आहे. C20 Plus 11 जूनला लाँच  केला जाईल, अशी घोषणा HMD Global ने केली आहे. यासंदर्भात IT Home वर एक पोस्टर प्रकाशित करण्यात आला आहे. (Nokia C20 Plus will launch with 3GB Ram and dual camera setup) 

Nokia C20 Plus लाँच पोस्टर  

लाँच  पोस्टरमध्ये तारखेव्यतिरिक्त नोकिया सी20 प्लसचा रियर लुक पण समोर आला आहे. पोस्टरनुसार फोनमध्ये एक मोठा वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. तसेच यात ड्युअल -कॅमेरा सेंसर सोबतच एलईडी फ्लॅश लाइट होगी.  

Nokia C20 Plus चे स्पेसिफिकेशन 

C-सीरीजचा नवीन स्मार्टफोन Nokia C20 Plus काही दिवसांपूर्वी गीकबेंच वेबसाइटवर स्पॉट केला गेला होता. गीकबेंच लिस्टिंगनुसार हा फोन ऑक्टा-कोर यूनिसोक प्रोसेसरसह येईल. या डिवाइसमध्ये 3GB रॅम आणि अँड्रॉइड 11 असेल. गीकबेंच लिस्टिंगनुसार या डिवाइसला सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये टेस्टमध्ये क्रमश: 126 आणि 476 गुण मिळेल आहेत.  

Nokiabar ने दिलेल्या माहितीनुसार डिवाइसमध्ये ड्युअल  कॅमेरा सेटअप असेल. तसेच, यात 5000 एमएएचची बॅटरी पण असेल. HMD Global या सीरीज अंतगर्त C30 नावाचा अजून एक स्मार्टफोन पण लाँच  करेल. ज्यात ड्युअल  कॅमेरा सेटअप आणि 6000 एमएएचची बॅटरी असेल.  

यापूर्वी कंपनीने सी-सीरीजमध्ये Nokia C10 आणि Nokia C20 स्मार्टफोन सादर केले आहेत. Nokia Nokia C20 Plus आणि Nokia 30 स्मार्टफोन अपग्रेड डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्ससह सादर केले जाऊ शकतात. Nokia C20 Plus आणि Nokia C30 स्मार्टफोन एकापेक्षा जास्त रियर कॅमेरा सेंसरसह सादर केले जातील.  

Web Title: Nokia c20 plus to launch on 11 june in china 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.