चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; बजेट सेगमेंटमध्ये नोकिया आणणार Nokia C30 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:53 PM2021-06-17T18:53:16+5:302021-06-17T18:57:10+5:30

Nokia C30 FCC certification: लाँचपूर्वी Nokia C30 स्मार्टफोन FCC वर लिस्ट झाला आहे, त्यामुळे या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.  

Nokia c30 gets fcc certification  | चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; बजेट सेगमेंटमध्ये नोकिया आणणार Nokia C30 

हा फोटो Nokia C20 Plus चा आहे.

googlenewsNext

Nokia C20 Plus फोन काही दिवसांपूर्वी सादर करण्यात आला होता. आता या सीरिजमध्ये कंपनी अजून एक फोन लाँच करणार आहे. हा फोन Nokia C30 नावाने लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने जरी याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी, वारंवार या फोनचे लीक्स समोर येत आहेत. आता Nokia C30 मॉडेल नंबर TA-1357 सह FCC वर दिसला आहे. (Nokia C30 spotted on FCC with 5,850mAh battery)  

Nokia C30 

FCC हि यूएसमधील सर्टिफिकेशन साइट आहे. एफसीसीवरील माहितीनुसार, या डिवाइसचा आकार 177.7 x 79.1mm असा असेल. तसेच, या फोनमध्ये 5,850mAh ची बॅटरी असेल. TA-1357 मध्ये LTE, 2.4GHz Wi-Fi आणि ब्लूटूथ असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात येईल.  

यापूर्वीच्या एका लीकमध्ये Nokia C30 ची रियर डिजाइन समोर आली होती. तसेच बॅटरीची माहिती देखील मिळाली होती. लीकमधून समजले आहे कि, यात एक एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे वर्तुळाकार कॅमेरा मॉड्यूल मध्ये दिले जातील. कॅमेऱ्याच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. डिवाइसच्या डावीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण असेल. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात येईल. या फोनची किंमत समजली नाही परंतु हि सीरिज लो बजेट असल्यामुळे हा फोन देखील कमी किंमतीत लाँच होईल.  

या सीरिजमधील जुन्या Nokia C20 Plus चे स्पेसिफिकेशन 

नोकियी सी20 प्लसमध्ये 6.5-इंचाचा 1600 × 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये Unisoc SC9863A प्रोसेसर आणि IMG8322 GPU आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 3GB रॅम आणि 32GB (eMMC 5.1) स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी नोकिया सी20 प्लसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. यात 8 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा आहे. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. नोकियी सी20 प्लसमध्ये Android 11 Go एडिशन देण्यात आला आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये 4950mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत चीनमध्ये 8,000 रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे.  

Web Title: Nokia c30 gets fcc certification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.