Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 07:52 PM2022-12-15T19:52:29+5:302022-12-15T19:53:28+5:30

Nokia C31 : कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोनला 5,050mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एका चार्जमध्ये तीन दिवस वापरता येईल.

Nokia C31 With Triple Rear Cameras, 5,050mAh Battery Launched in India: Price, Specifications | Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत...

Nokia C31 भारतात लाँच; ट्रिपल रियर कॅमेरासह दमदार बॅटरी, जाणून घ्या किंमत...

Next

नवी दिल्ली : भारतात Nokia C31 स्मार्टफोन गुरुवारी लाँच करण्यात आला. हा कंपनीचा C-सीरीजमधील लेटेस्ट स्मार्टफोन आहे. हे सप्टेंबरमध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आले. हा स्वस्त नोकिया स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा, 6.7-इंचाचा डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. तसेच, हा Android 12 वर चालतो आणि 4GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज पॅक देण्यात आला आहे. 

कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोनला 5,050mAh बॅटरीचा सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे एका चार्जमध्ये तीन दिवस वापरता येईल. तसेच, नोकिया C31 स्मार्टफोनची भारतातील किंमत 3GB + 32GB व्हेरिएंटसाठी 9,999 रुपये आणि 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे चारकोल आणि माइंड कलर शेड्समध्ये सादर करण्यात आले आहे. दरम्यान, ग्राहक सध्या हा स्मार्टफोन नोकिया इंडियाच्या वेबसाइटवरून खरेदी करू शकतात.

Nokia C31 चे स्पेसिफिकेशन्स
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 12 वर चालतो आणि त्यात 6.74-इंचाचा HD+ (720×1,600 पिक्सेल) डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 1.6Hz पीक स्पीडसह ऑक्टा-कोर युनिसॉक प्रोसेसर आहे. या प्रोसेसरसह यूजर्सना 4GB RAM मिळेल. 

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपचा प्राइमरी कॅमेरा 13MP चा आहे. यासोबतच, यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर सेल्फीसाठी 5MP सेंसर आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये पोर्ट्रेट मोड, एचडीआर आणि नाईट मोड सारखे अनेक मोड देखील सपोर्ट केले आहेत.

Nokia C31 स्मार्टफोनमध्ये 128GB पर्यंत इंटरनल मेमरी आहे. कार्डच्या मदतीने ते वाढवताही येते. कनेक्टिव्हिटीबाबत सांगायचे झाल्यास Wi-Fi 802.11 b/g/n, GPS, AGPS, Galileo, Bluetooth v4.2, एक 3.5mm ऑडिओ जॅक आणि एक micro-USB पोर्टचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, स्मार्टफोनला फिंगरप्रिंट सेन्सर मागील बाजूस बसवलेला आहे. हा फोन IP52 वॉटर रेसिस्टंट डिझाइनचा आहे. Nokia C31 ची बॅटरी 5,050mAh असून 10W चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा सिंगल चार्जमध्ये तीन दिवस चालवता येते.

Web Title: Nokia C31 With Triple Rear Cameras, 5,050mAh Battery Launched in India: Price, Specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.