चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 14, 2021 12:47 PM2021-09-14T12:47:48+5:302021-09-14T12:48:15+5:30

Nokia G10 Price In India: नोकियाने भारतात दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. यात लो बजेट Nokia C01 Plus आणि बजेट स्मार्टफोन Nokia G10 चा समावेश आहे.  

Nokia g10 with 5050mah battery launched in india price specs and more  | चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच 

चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ; नोकियाचा बजेट स्मार्टफोन Nokia G10 भारतात लाँच 

Next
ठळक मुद्देपॉवरबॅकअपसाठी Nokia G10 मध्ये 5050mAh ची बॅटरी देण्यात आली आहेनोकिया जी10 स्मार्टफोनची किंमत 12,149 रुपये ठेवण्यात आली आहे.

नोकियाने भारतात दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने Nokia C01 Plus लो बजेटमध्ये सादर केला आहे. तर Nokia G10 स्मार्टफोन बजेट कॅटेगरीमध्ये लाँच करण्यात आला आहे. नोकिया जी10 स्मार्टफोनमध्ये दोन वर्षांपर्यंत सॉफ्टवेयर अपडेट आणि तीन वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या लेखात आपण Nokia G10 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेणार आहोत.  

Nokia G10 ची किंमत 

नोकिया जी10 स्मार्टफोनची किंमत 12,149 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन नाइट आणि डस्ट कलर ऑप्शनमध्ये nokia.com वरून विकत घेता येईल. Jio price support offer अंतर्गत Nokia G10 स्मार्टफोन 11,150 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Nokia G10 चे स्पेसिफिकेशन्स 

नोकिया जी10 मध्ये 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक V नॉच असलेला डिस्प्ले आहे. प्रोसेसिंग या नोकिया फोनमध्ये ऑक्टकोर MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजची जोड मिळते. यातील स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. डेडिकेटड गुगल असिस्टंट बटनसह येणारा हा फोन अँड्रॉइड 11 वर चालतो.  

फोटोग्राफीसाठी या बजेट स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यात मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पॉवरबॅकअपसाठी Nokia G10 मध्ये 5050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Web Title: Nokia g10 with 5050mah battery launched in india price specs and more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.