3 दिवस पुरेल ‘या’ लो बजेटमध्ये नोकियाच्या स्मार्टफोनची बॅटरी; शानदार Nokia G11 स्मार्टफोनची गुपचूप एंट्री
By सिद्धेश जाधव | Published: February 15, 2022 05:44 PM2022-02-15T17:44:52+5:302022-02-15T17:45:09+5:30
Nokia G11 स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट आणि 5,050mAh ची बॅटरी देण्यात आला आहे.
Nokia G11 स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये युरोपियन बाजारात सादर करण्यात आला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी या सीरिजमध्ये Nokia G21 देखील सादर केला होता. Nokia G21 स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट, 50-मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 3 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर केला जाईल. पुढे आम्ही नोकिया जी11 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची माहिती दिली आहे.
Nokia G11 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Nokia G11 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 5,050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुरक्षा मिळते.
Nokia G11 स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. स्टोरेज वाढवण्यासाठी microSD कार्ड स्लॉट मिळतो. नोकियाचा हा फोन Android 11 वर चालतो. नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागे 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Nokia G11 ची किंमत
Nokia G11 स्मार्टफोनचा एकमेव 3GB RAM आणि 32GB स्टोरेज मॉडेल युरोपियन बाजारात आला आहे. या फोनची किंमत यूकेमध्ये 119 पाउंड ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमरे 12000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लवकरच हा फोन भारतात देखील लाँच केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
- 18GB RAM आणि 6000mAh बॅटरीसह आले 2 फाडू फोन; ASUS ROG Phone 5s आणि 5s Pro भारतात घालणार धुमाकूळ
- TV फक्त रिमोटवरून करता बंद? विजेचं बिल वाढवते ‘ही’ छोटीशी चूक; या टिप्स करा फॉलो