12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होणार Nokia G20; 7 जुलैपासून करता येणार प्री-बुकिंग 

By सिद्धेश जाधव | Published: July 5, 2021 12:41 PM2021-07-05T12:41:00+5:302021-07-05T12:42:09+5:30

Nokia G20 India Price: नोकिया जी20 स्मार्टफोन भारतात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अमेझॉन इंडियावर Nokia G20 चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे.

Nokia G20 India Price 12990 prebook from 7 july on amazon  | 12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होणार Nokia G20; 7 जुलैपासून करता येणार प्री-बुकिंग 

Nokia G20 अंतर्राष्ट्रीय बाजारात 20:9 अस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे.

Next

Nokia ब्रँडचे मालकी असणारी टेक कंपनी HMD Global लवकरच भारतात आपल्या ‘जी सीरिज’ मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या सीरिजमधील Nokia G10 आणि Nokia G20 स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आले आहेत. यातील नोकिया जी20 स्मार्टफोनचे प्रोडक्ट पेज ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर लाईव्ह करण्यात आले आहे. या प्रोडक्ट पेजवर Nokia G20 स्मार्टफोन येत्या 7 जुलैपासून प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होईल आणि याची किंमत 12,990 रुपयांपासून सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.  (Nokia G20 India Pre-Orders To Begin on July 7, 2021)

Nokia G20 ची किंमत  

नोकिया जी20 स्मार्टफोन भारतात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अमेझॉन इंडियावर Nokia G20 चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. या प्रॉडक्ट पेजवर या स्मार्टफोनच्या किंमतीची तसेच काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. Nokia G20 भारतात 7 जुलैपासून प्री आर्डर करता येईल तसेच या स्मार्टफोनची किंमत 12,999 रुपयांपासून सुरु होईल. ही या स्मार्टफोनच्या छोट्या व्हेरिएंटची किंमत असू शकते, परंतु हा स्मार्टफोन एकापेक्षा जास्त व्हेरिएंटमध्ये लाँच होईल कि नाही याची माहिती अजूनतरी उपलब्ध झाली नाही.  

Nokia G20 चे स्पेसिफिकेशन्स 

Nokia G20 अंतर्राष्ट्रीय बाजारात 20:9 अस्पेक्ट रेश्योसह सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 11 फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर मिळतो. या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट देण्यात आला आहे.  

Nokia G20 मधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या नोकिया स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,050एमएएच बॅटरी मिळते.  

Web Title: Nokia G20 India Price 12990 prebook from 7 july on amazon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.