Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो  

By सिद्धेश जाधव | Published: February 14, 2022 12:48 PM2022-02-14T12:48:41+5:302022-02-14T12:48:58+5:30

Nokia G21 स्मार्टफोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत.  

Nokia G21 Smartphone Launched Check Price And Details  | Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो  

Nokia ची हवा! 3 दिवस चालणार या नव्या फोनची बॅटरी; 50MP कॅमेरा काढणार झक्कास फोटो  

googlenewsNext

HMD Global नं आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन सादर केला आहे. गेले काही दिवस बातम्यांमधून समोर आलेला Nokia G21 अखेर ग्राहकांच्या भेटीला आला आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 4GB RAM, 5050mAh बॅटरी आणि Android 11 सह युरोपियन बाजारात सादर करण्यात आला आहे. गेल्यावर्षी लाँच झालेल्या Nokia G20 ची हा स्मार्टफोन जागा घेईल.  

Nokia G21 चे स्पेसिफिकेशन्स 

Nokia G21 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Unisoc T606 प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे, सोबत ग्राफिक्ससाठी Mali G75-MP1 जीपीयू मिळतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम मिळतो, त्याचबरोबर 64GB आणि 128GB चे दोन स्टोरेज ऑप्शन आहेत. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. नोकियाचा स्मार्टफोनमध्ये Android 11 वर चालतो. यात 5,050mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप देते, असा दावा कंपनीनं केला आहे.  

Nokia G21 ची किंमत 

Nokia G21 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 4GB RAM आणि 64GB व 128GB स्टोरेज मिळते. या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 170 युरो अर्थात सुमारे 14500 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट नॉर्डिक ब्लू आणि डस्क ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. एचएमडी ग्लोबलनं या मोबाईलच्या भारतीय लाँचची माहिती मात्र दिलेली नाही. 

हे देखील वाचा:

Web Title: Nokia G21 Smartphone Launched Check Price And Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.