किफायतशीर किंमतीत येऊ शकतो Nokia G300 5G; लीकमधून खास स्पेसिफिकेशनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 05:16 PM2021-10-01T17:16:33+5:302021-10-01T17:16:40+5:30
Upcoming Nokia Phone Nokia G300 5G: Nokia G300 5G स्मार्टफोन कंपनीचा आगामी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असू शकतो. जो Nokia G50 च्या डिजाईनसह सादर केला जाईल.
नोकियाने आपला किफायतशीर 5G फोन Nokia G50 काही दिवसनपूर्वी बाजारात उतरवला होता. आता कंपनी अजून नवीन किफायतशीर स्मार्टफोन Nokia G300 5G सादर करू शकते. या फोनचेचा की फोटो आणि स्पेसिफिकेशन एका लीकमधून समोर आले आहेत. त्यानुसार हा फोन Qualcomm Snapdragon 480 5G प्रोसेसरसह बाजारात येईल. प्रोसेसरसह या फोनचे काही स्पेसीफिकेशन्स Nokia G50 सारखेच आहेत.
Nokia G300 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Nokiapoweruser वेबसाईटने Nokia G300 5G चे फोटो आणि स्पेसिफिकेशन लीक केले आहेत. त्यानुसार या फोनमध्ये 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर चालेल आणि यात Qualcomm Snapdragon 480 5G प्रोसेसर मिळू शकतो. या फोनमधील 64GB इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येईल.
Nokia G300 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 16MP चा मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळेल. यात कनेक्टिविटीसाठी GPS, Wi-Fi, 5G, LTE आणि Bluetooth असे ऑप्शन मिळतील. फोनमध्ये 4470mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोनची डिजाईन Nokia G50 सारखीच असेल, जो गेल्या महिन्यात कंपनीने सादर केला आहे. Nokia G300 5G कधी लाँच होईल याची माहिती मात्र समजली नाही.