नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; 48MP कॅमेऱ्यासह Nokia G50 5G होऊ शकतो सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 3, 2021 12:20 PM2021-09-03T12:20:36+5:302021-09-03T12:26:01+5:30

Nokia G50 5G Phone Listing: Nokia G50 5G स्मार्टफोन कंपनीच्या फ्रांस इन्स्टाग्राम अकॉउंटवर लीक झाला होता. आता हा स्मार्टफोन चीनच्या सर्टिफिकेशन साईट TENAA वर दिसला आहे.  

Nokia g50 5g listed on china tenaa listing come with 48mp main rear camera specification  | नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; 48MP कॅमेऱ्यासह Nokia G50 5G होऊ शकतो सादर  

नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन वेबसाईटवर लिस्ट; 48MP कॅमेऱ्यासह Nokia G50 5G होऊ शकतो सादर  

Next
ठळक मुद्देहा स्मार्टफोन चीनच्या सर्टिफिकेशन साईट TENAA वर दिसला आहे.  Nokia G50 5G स्मार्टफोन TENAA वर मॉडेल नंबर TA-1361 सह लिस्ट करण्यात आला आहे.

उशिरा का होईना परंतु Nokia ब्रँड आपला 5G पोर्टफोलियो वाढवण्यास सुरुवात करत आहे. कंपनीच्या जी-सीरीजमधील आगामी Nokia G50 5G स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्रांस इन्स्टाग्राम अकॉउंटवर लीक झाला होता. थोड्या वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. आता हा स्मार्टफोन चीनच्या सर्टिफिकेशन साईट TENAA वर दिसला आहे.  

Nokia G50 5G स्मार्टफोन TENAA वर मॉडेल नंबर TA-1361 सह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. परंतु या फोनबाबत नोकिया ब्रँडचा मालकी हक्क असणाऱ्या HMD Global ने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याआधी हा फोन जुलैअखेर सादर केला जाईल अशी बातमी आली होती, परंतु तसे झाले नाही.  

Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स 

लिस्टिंग नुसार, मॉडेल नंबर TA-1361 मध्ये Android 11 OS असेल. तसेच यात 6.82 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्युशन 720 x 1640 पिक्सल असेल. तसेच Nokia G50 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 490 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.  

फोटोग्राफीसाठी Nokia G50 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. या फोनमध्ये फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,850 एमएएचची बॅटरी देण्यात येईल.  

याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Nokia G50 हा स्मार्टफोन जी सीरिजमधील पहिला 5G स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. इंस्टाग्राम पोस्टनुसार हा फोन ब्लू आणि मिडनाइट सन रंगात सादर केला जाईल. Nokia G50 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि वर्तुळाकार रियर कॅमेरा मॉड्यूल मिळेल.   

Nokia G50 5G ची किंमत   

LambdaTek या वेबसाइटवर आगामी Nokia G50 5G स्मार्टफोन टॅक्ससह 217.52 GBP (सुमारे 22,100 रुपये) मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. दुसरीकडे MoreComputers ने आपल्या वेबसाइटवर नोकियाचा हा स्मार्टफोन 207.56 GBP (सुमारे 21,100 रुपये) मध्ये लिस्ट केला आहे. या दोन्ही वेबसाइटवर Nokia G50 स्मार्टफोनचा 4GB रॅम + 64GB मॉडेल लिस्ट करण्यात आला आहे. 

Web Title: Nokia g50 5g listed on china tenaa listing come with 48mp main rear camera specification 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.