दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Nokia G50 5G होऊ शकतो सादर; कंपनीने शेयर केला पोस्टर
By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 07:21 PM2021-09-21T19:21:14+5:302021-09-21T19:22:05+5:30
Nokia G50 5G Launch: Nokia G50 सोबतच Nokia T20 अँड्रॉइड टॅबलेट आणि इतर फोन्स सादर करू शकते. नोकिया जी50 5G हा कंपनीच्या जी सीरिजमधील पहिला 5G Phone असेल.
Nokia ने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर एक टीजर पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरमध्ये 2 फिचर फोन, तीन स्मार्टफोन आणि एक मोठा बॉक्स दिसत आहे. पोस्टर सोबत कंपनीने 6 ऑक्टोबर 2021 या तारखेचा उल्लेख केला आहे. यावरून कंपनी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेगा लाँच इव्हेंट करणार असल्याचे समजत आहे.
6 ऑक्टोबर 2021 च्या इव्हेंटमध्ये सादर होणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये Nokia G50 5G स्मार्टफोनचा देखील समावेश असू शकतो. Nokia G50 सोबतच Nokia T20 अँड्रॉइड टॅबलेट आणि इतर फोन्स सादर करू शकते. नोकिया जी50 5G हा कंपनीच्या जी सीरिजमधील पहिला 5G Phone असेल.
Nokia G50 चे संभाव्य स्पेसिफिकेशन
Nokia G50 मध्ये Android 11 OS असेल. तसेच यात 6.82 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्युशन 720 x 1640 पिक्सल असेल. तसेच Nokia G50 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 490 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, एक यूएसबी-सी पोर्ट आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक दिला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी Nokia G50 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. या फोनमध्ये फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,850 एमएएचची बॅटरी देण्यात येईल.
याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Nokia G50 हा स्मार्टफोन जी सीरिजमधील पहिला 5G स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. इंस्टाग्राम पोस्टनुसार हा फोन ब्लू आणि मिडनाइट सन रंगात सादर केला जाईल. Nokia G50 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि वर्तुळाकार रियर कॅमेरा मॉड्यूल मिळेल.