दमदार साउंड आणि स्टायलिश डिजाइन; 15 हजारांच्या आत Nokia चा शानदार Smart TV लाँच
By सिद्धेश जाधव | Published: May 3, 2022 06:12 PM2022-05-03T18:12:38+5:302022-05-03T18:12:48+5:30
Nokia नं भारतात नवीन 4K Smart TV ची घोषणा केली आहे. हे टीव्ही मॉडेल शानदार डिजाईन आणि दमदार फीचर्ससह आले आहेत.
Nokia नं भारतातील आपल्या Smart TV लाईनअपचा विस्तार केला आहे. कंपनीनं नवीन Android स्मार्ट टीव्हीची घोषणा केली आहे. यातील सर्वात छोटा 32 इंचाचा मॉडेल एचडी रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तर 55 इंचाच्या मॉडेलमध्ये 4K कन्टेन्ट पाहता येईल. असे 5 टीव्ही नोकियानं भारतात आणले आहेत. Nokia TV 2022 लाईनअपमध्ये 32 इंच, 40 इंच, 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाच्या मॉडेलचा समावेश आहे.
Nokia TV 2022 चे स्पेक्स
या लाईनअप मधील सर्व टीव्हीमध्ये अँड्रॉइड टीव्ही 11 ओएसवर चालतात. तसेच यात डॉल्बी ऑडियो असलेले 24W स्पिकर आणि ड्युअल बँड वायफाय मिळतो. यावर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि युट्युब असे लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्स मिळतात.
4K मॉडेलसह 3840 x 2160 रिजोल्यूशनला सपोर्ट करतात. स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी 60Hz चा रिफ्रेश रेट देखील मिळतो. हे टीव्ही MEMC टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. कंपनीनं डिस्प्लेमध्ये HDR10 आणि डॉल्बी व्हिजन देखील दिला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉड कोर SoC चा वापर केला आहे, त्याचबरोबर 2GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज मिळते.
32 इंचाचा मॉडेल 1366 x 768 पिक्सल रिजोल्यूशनसह येतो. 40 इंचाच्या मॉडेलमध्ये फुल एचडी रिजोल्यूशन आहे. हे टीव्ही 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेजसहयेतात. यातील क्वॉड कोर CPU शानदार प्रोसेसिंग पावर देतो.
Nokia TV 2022 सिरीजची किंमत
सीरिजमधील 32 इंचाचा मॉडेल 14,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 40 इंचाच्या मॉडेलची किंमत 21,990 रुपये ठेवण्यात आली आहे. 43 इंचाचा 4K व्हेरिएंट 27,999 रुपये, 50 इंचाचा मॉडेल 33,990 रुपये आणि 55 इंचाचा व्हेरिएंट 38,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टीव्हीची विक्री फ्लिपकार्टवरून करण्यात येईल.