सॅमसंग-नोकिया पुन्हा आमने सामने! स्मार्टफोन्ससह Nokia T20 टॅबलेट होऊ शकतो लवकरच लाँच
By सिद्धेश जाधव | Published: September 21, 2021 12:30 PM2021-09-21T12:30:04+5:302021-09-21T12:30:39+5:30
Nokia T20 Tablet Launch: Nokia ने आपल्या 6 ऑक्टोबरच्या इव्हेंटमधून फिचरफोन आणि स्मार्टफोनसह आपला पहिला अँड्रॉइड टॅबलेट सादर करू शकते.
Nokia ने आपल्या 6 ऑक्टोबरच्या इव्हेंटचा टीजर शेयर केला आहे. या टीजरमध्ये दोन फिचरफोन, तीन स्मार्टफोन आणि एक मोठा बॉक्स दिसत आहे. हा बॉक्स कंपनीच्या पहिल्यावहिल्या अँड्रॉइड टॅबलेटचा असू शकतो, अशी चर्चा आहे. सध्या अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये सॅमसंगचा दबदबा आहे त्यामुळे जुने प्रतिस्पर्धी पुन्हा आमने सामने येऊ शकतात. परंतु यावेळी सॅमसंगसह नोकियाला शाओमी, रियलमी आणि इतर टॅबलेट निर्मात्यांकडून देखील आव्हान मिळेल.
HMD Global च्या मालकीच्या नोकिया ब्रँडने आपल्या आगामी इव्हेंटचा टीजर शेयर केला आहे. हा इव्हेंट 6 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनी 6 डिवाइस बाजारात सादर करणार आहे. यात Nokia 3310 व Nokia 8110 या दोन फिचर फोन्स आणि Nokia 6.2 व Nokia XR20 या स्मार्टफोन्सचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचबरोबर एक मोठा सफेद बॉक्स देखील टीजर इमेजमध्ये दिसत आहे. हा बॉक्स Nokia T20 टॅबलेटचा असण्याची शक्यता आहे.
Nokia T20 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
लिक्सनुसार या टॅबलेटमध्ये 10.36 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. या टॅब वायफाय आणि 4G अशा दोन व्हेरिएंटमध्ये बाजारात सादर केला जाऊ शकतो. यात Unisoc प्रोसेसरचा वापर कंपनी करू शकते. ज्याला 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजची जोड देण्यात येईल. Android 11 वर चालणार हा टॅब यह 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होममुळे लॅपटॉप आणि टॅबलेटची मागणी वाढली आहे. त्यामुळे रियलमी-नोकिया सारख्या कंपन्या टॅबलेट सेगमेंटमध्ये सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. HMD Global अंतर्गत नोकिया ब्रँड गेल्यानंतर हा पहिला अँड्रॉइड टॅबलेट असेल. परंतु याआधी Nokia N1 नावाचा अँड्रॉइड टॅबलेट कंपनीने सादर केले आहे.