Nokia Phone: Nokia 2760 Flip दिसतो साधा पण 4G स्पीडसह देतो WhatsApp ची मजा; किंमतही परवडणारी
By सिद्धेश जाधव | Published: January 7, 2022 12:05 PM2022-01-07T12:05:37+5:302022-01-07T12:05:55+5:30
Nokia Phone: CES 2022 मध्ये HMD Global नं अनेक स्मार्टफोन्स सादर केले आहेत. सोबत कंपनीनं Nokia 2760 Flip 4G नावाचा फिचर फोन देखील सादर केला आहे.
HMD Global कडे लोकप्रिय Nokia ब्रँडचा मालकी हक्क आहे. कंपनीनं यंदाच्या CES 2022 मध्ये प्रोडक्ट्सचा वर्षाव केला आहे. या इव्हेंटमध्ये Nokia C100, Nokia C200, Nokia G100 आणि Nokia G400 हे स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. ज्यात कंपनीच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन आणि 5G Phone चा समावेश आहे.
स्मार्टफोन्स सोबत कंपनीनं स्वस्त 4G Flip फोन लाँच करून जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत. CES 2022 मध्ये HMD Global नं Nokia 2760 Flip फोन सादर केला आहे. हा 2007 मध्ये आलेल्या Nokia 2760 Flip चा अपग्रेडेड 4G व्हर्जन आहे. कंपनीनं फोनच्या डिजाईनमध्ये कोणताही मोठा बदल केलेला नाही.
Nokia 2760 Flip 4G चे स्पेसिफिकेशन्स
Nokia 2760 Flip 4G फोन KaiOS देण्यात आला आहे, त्यामुळे यात WhatsApp आणि Facebook सारखे अनेक अॅप्स वापरता येतात. या फोनमध्ये एक सेकंडरी डिस्प्ले आणि अतिरिक्त बटन देण्यात आलं आहे जे कॉल आणि शेयर लोकेशन बटन म्हणून वापरता येतं. वयोवृद्धांसाठी हा फोन एक चांगला पर्याय ठरू शकतो.
लीकनुसार, या फोनमध्ये 240X320 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत T9 कीबोर्ड आणि D-पॅड देण्यात आला आहे. या फीचर फोनमध्ये 32GB ची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येते. यात 1450mAh ची बॅटरी आणि 5MP चा सिंगल रियर कॅमेरा मिळतो.
Nokia 2760 Flip 4G ची किंमत
Nokia 2760 Flip 4G ची किंमत कंपनीनं 79 डॉलर (सुमारे 5,900 रुपये) ठेवली आहे. हा फोन सर्वप्रथम अमेरिकन बाजारात सादर केला जाईल. त्यानंतर हा फोन जगभरात सादर केला जाऊ शकतो.
हे देखील वाचा:
काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी
फक्त 139 रुपयांमध्ये घरी आणा SmartWatch; सिंगल चार्जमध्ये 5 दिवस वापरा Fire-Boltt Ultron