8GB RAM सह दणकट लॅपटॉपची एंट्री; जाणून घ्या Nokia PureBook Pro ची किंमत आणि फीचर्स
By सिद्धेश जाधव | Published: February 26, 2022 04:08 PM2022-02-26T16:08:23+5:302022-02-26T16:08:47+5:30
Nokia PureBook Pro: Nokia PureBook Pro मध्ये फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 12th जनरेशन इंटेल i3 प्रोसेसर मिळतो.
Nokia नं लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री घेतली आहे. एचएमडी ग्लोबलच्या मालकीच्या या ब्रँडनं ऑफ ग्लोबल ब्रँड सोबत भागीदारी करून आपला पहिला वाहिला लॅपटॉप Nokia PureBook Pro लाँच केला आहे. या लॅपटॉपची आणि डेव्हलपमेंट नोकिया ब्रँडनं केली आहे. जे युजर्स किंमतीसाठी परफॉर्मन्सशी तडजोड करत नाहीत, अशा लोकांसाठी हा लॅपटॉप असल्याचा ऑफ ब्रँडनं म्हटलं आहे.
यात फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत 12th जनरेशन इंटेल i3 प्रोसेसर मिळतो. कंपनीनं या लॅपटॉपची डिजाईन देखील खूप स्लिक ठेवली आहे. Nokia PureBook Pro लॅपटॉपची किंमत 699 युरो ठेवण्यात आली आहे, जी सुमारे 59,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते.
Nokia PureBook Pro ची वैशिष्ट्ये
या लॅपटॉपचे दोन साईज व्हेरिएंट आहेत. एक 15.6 इंचाचा मॉडेल तर मोठ्या मॉडेलमध्ये 17.3 इंचाचा डिस्प्ले मिळतो. या लॅपटॉपमध्ये FullHD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही लॅपटॉप Intel i3 Gen 12 प्रोसेसरसह विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. सोबत 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजसह देण्यात आली आहे.
लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि फिंगरप्रिंट रीडर मिळतो. तसेच व्हिडीओ कॉलसाठी 2 मेगापिक्सलचा HD वेबकॅम आहे. छोट्या व्हेरिएंटचे वजन 1.7 किलोग्राम आहे. तर 17.3 इंचाचा मॉडेल 2.5 किलोग्रामचा आहे. छोट्या व्हेरिएंटमध्ये 57wh ची बॅटरी आणि मोठ्या लॅपटॉपमध्ये 67wh ची बॅटरी मिळते. नोकियाचा सर्वात पहिला लॅपटॉप ब्लू, डार्क ग्रे, रेड आणि सिल्वर रंगात विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- चिनी कंपन्यांना धक्का! स्वदेशी कंपनी करतेय स्वस्त आणि दमदार Smartphone ची तयारी
- लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु
- अँड्रॉइड युजर्सना Apple कडे वळवण्याची तयारी; सर्वात स्वस्त 5G iPhone येतोय ‘या’ दिवशी, किंमतही समजली